ETV Bharat / bharat

क्रिकेट बॉल दिला नाही म्हणून तरुण चढला चक्क वीजेच्या टॉवरवर - मध्य प्रदेश क्रिकेट बॉल

मिळालेल्या माहितीनुसार, सीधी जिल्ह्यातील पौडी गावात ही घटना घडली. घरगुती वादातून एक तरुण चक्क वीजेच्या टॉवरवर चढून बसला होता. याची माहिती गावात पसरताच, टॉवरभोवती लोकांची गर्दी जमली. लोक त्याला खाली उतरण्याचे आवाहन करत होते, तसेच एक तरुण त्याला वाचवण्यासाठी स्वतः टॉवरवर चढला होता. लोकांनी सांगितले, की क्रिकेटचा बॉल घेण्यासाठी घरच्यांनी पैसे दिले नाही, म्हणून हा तरुण टॉवरवर चढला होता.

Simaria police post
क्रिकेट बॉल दिला नाही म्हणून तरुण चढला चक्क वीजेच्या टॉवरवर
author img

By

Published : Feb 8, 2021, 3:59 PM IST

भोपाळ : मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यामध्ये चक्क क्रिकेटचा बॉल घेण्यासाठी घरच्यांनी पैसे न दिल्यामुळे एक तरुण वीजेच्या टॉवरवर चढून बसला. पाहता पाहता ही गोष्ट सगळ्या गावात पसरली, आणि या तरुणाला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. या तरुणाला खाली उतरवण्यासाठी म्हणून आणखी एक तरुण या टॉवरवर चढला होता.

क्रिकेट बॉल दिला नाही म्हणून तरुण चढला चक्क वीजेच्या टॉवरवर

मिळालेल्या माहितीनुसार, सीधी जिल्ह्यातील पौडी गावात ही घटना घडली. घरगुती वादातून एक तरुण चक्क वीजेच्या टॉवरवर चढून बसला होता. याची माहिती गावात पसरताच, टॉवरभोवती लोकांची गर्दी जमली. लोक त्याला खाली उतरण्याचे आवाहन करत होते, तसेच एक तरुण त्याला वाचवण्यासाठी स्वतः टॉवरवर चढला होता. लोकांनी सांगितले, की क्रिकेटचा बॉल घेण्यासाठी घरच्यांनी पैसे दिले नाही, म्हणून हा तरुण टॉवरवर चढला होता.

तब्बल सहा तासांनंतर उतरला खाली..

पोलीस प्रशासनाने तब्बल सहा तास मेहनत केल्यानंतर, अखेर सायंकाळी हा तरुण स्वतःच खाली उतरला. त्याला काही ठिकाणी दुखापतदेखील झाली होती, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. टॉवरमध्ये अद्याप वीजेच्या तार बसवल्या नसल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याचे मत चुरहटचे डीएसपी नीरज नामदेव यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : नव्या एफडीआयपासून देशाला वाचविले पाहिजे, परदेशी सेलिब्रिटींना मोदींचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.