शोपियान - जिल्ह्यातील अवनिरा भागात दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. सीमा सुरक्षा दलांनी आज शोध अभियान राबवत २ दहशतवाद्यांना एनकॉउंटरमध्ये ठार केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास दहशतवाद्यांनी शोपियान जिल्ह्यात सीमेवरून घुसखोरी केली होती. ही बाब लक्षात येताच सीमेवरच्या जवानांनी शोध अभियान राबवले. या अभियानादरम्यान उडालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. ही कारवाई अवनिरा भागात करण्यात आली आहे.
घटनेबद्दल माहिती देताना पोलीस अधीक्षक एसपी पानी यांनी माहिती देताना सांगितले, कारवाईत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यांचे मृतदेह त्यांच्या कुुटुंबियाकडे सोपवण्यात आले आहेत. ही कारवाई करताना कोणतीही हानी झाली नाही. शोध अभियान संपले असून दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास चालू आहे.