लखनऊ - उत्तरप्रदेशातील आग्रा जिल्ह्यामध्ये एका कालव्यामध्ये जुन्या तोफा(मोर्टार्स) सापडल्या आहेत. फतेहपूर सिक्री जवळील मंडी गुड येथील एका गावामध्ये शनिवारी या तोफा स्थानिक नागरिकांना सापडल्या. तोफ पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
-
Agra: Two dummy mortars were found by locals in a canal at Mandi Gud village in Fatehpur Sikri yesterday.Police investigation underway. SP(West) Ravi Kumar says,"mortars used in previous wars can be found buried even after several yrs.Still public should stay alert&inform us 1st" pic.twitter.com/jwFA0m3qHE
— ANI UP (@ANINewsUP) August 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Agra: Two dummy mortars were found by locals in a canal at Mandi Gud village in Fatehpur Sikri yesterday.Police investigation underway. SP(West) Ravi Kumar says,"mortars used in previous wars can be found buried even after several yrs.Still public should stay alert&inform us 1st" pic.twitter.com/jwFA0m3qHE
— ANI UP (@ANINewsUP) August 31, 2019Agra: Two dummy mortars were found by locals in a canal at Mandi Gud village in Fatehpur Sikri yesterday.Police investigation underway. SP(West) Ravi Kumar says,"mortars used in previous wars can be found buried even after several yrs.Still public should stay alert&inform us 1st" pic.twitter.com/jwFA0m3qHE
— ANI UP (@ANINewsUP) August 31, 2019
हेही वाचा - केरळमध्ये 67 व्या नेहरू ट्रॉफी बोट स्पर्धेची रोमांचक सुरुवात...
तोफा सापडल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही तोफा ताब्यात घेतल्या आहेत. खूप वर्षांपूर्वी झालेल्या युद्धातील तोफाही जमिनीखाली सापडू शकतात, असा अंदाज आग्र्याचे पोलीस अधिक्षक रवी कुमार यांनी सांगितले. मात्र, लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा - तब्बल ४२ वर्षांनंतर पूर्ण झालेला कालवा एका दिवसात गेला वाहून..
या तोफा नक्की कोणत्या काळातील आहेत, तेथे कशा आल्या याचा तपास आता पोलीस करत आहेत. तसेच या तोफा खोट्या आहेत का याचाही पोलीस तपास करत आहेत. दोन्ही तोफांना पुढील तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या भागात आणखी तोफा सापडल्या तर प्रथम पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.