ETV Bharat / bharat

झारखंडच्या खूंटी जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार - gang rape in khunti

झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर 10 जणांनी मिळून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Two minor girl gang raped in khunti
झारखंडच्या खूंटी जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामुहिक अत्याचार
author img

By

Published : Apr 11, 2020, 12:15 PM IST

खुंटी (झारखंड) - देशात लॉकडाऊन असल्यामुळे गुन्हेगारीचे, अत्याचाराचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर 10 जणांनी मिळून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 2 एप्रिलला घडली. पोलिसांनी सहा अल्पवयीन आरोपींसह 9 जणांना अटक केलीआहे. दोन्ही पीडितांच्या जबाबानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

9 जणांना अटक करण्यात आली असल्याचे पोलीस अधिकारी आशुतोष शेखर यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दोन्ही मुली शेळ्या चरायला घेऊन गेल्या होत्या. गावातीलच 10 जण आले आणि त्यांना पकडून जंगलात घेऊन गेले आणि अत्याचार केला. या घटनेची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देत सोडून दिले. पीडित मुलींनी या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

दोन्ही मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान हे प्रकरण दाबण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला. मात्र, पीडितांच्या कुटुंबीयांनी न घाबरता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.