नवी दिल्ली - पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयाचे दोन कनिष्ठ अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते दोघेही गाडीने उच्चायुक्तालयातून ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, ते आपल्या कार्यस्थळी पोहोचले नाही.
दोघेही जवळपास दोन तासांपेक्षा जास्त काळापासून बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप कुणीही त्याबाबत अधिकृतपणे बोललेले नाही. भारतीय उच्चायुक्तालयाने हा मुद्दा पाकिस्तान प्रशासनाकडे मांडलेला आहे.
पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयाने याआधी तेथील परराष्ट्र मंत्रालयाला निषेध पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानी यंत्रणांकडून भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा होत असलेल्या छळाबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर भारताने असे १३ उदाहरणे त्यांच्या नजरेस आणून दिली. त्यानंतर अशा घटना थांबविण्याची आणि चौकशी करण्यास सांगितले. तसेच असे प्रकार परत घडू नये, यासाठी संबंधित यंत्नणांना सूचना देण्यास सांगितले होते.
पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दोन अधिकाऱ्यांनी दिल्लीमध्ये हेरगिरी केल्याचा आरोपाखाली भारताने त्यांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे.