हैदराबाद - लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरात ठेवण्यासाठी पोलीस त्यांच्या काठीचा पुरेपूर वापर करत आहेत. काही प्रमाणात हे सर्व ठीकदेखील आहे, मात्र हैदराबादमधील दोन पोलिसांनी हे करताना कोणतेही तारतम्य न बाळगता, तरुणांना अगदी रक्त येईपर्यंत मारहाण केली. यामुळे या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. हैदराबाद पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी मंगळवारी याबाबत आदेश दिले.
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यांपैकी एक मीर चौक पोलीस ठाण्यामधील कॉन्स्टेबल आहे, तर दुसरा गोळकोंडा पोलीस ठाण्यामधील होमगार्ड आहे. शहर पोलीस प्रमुखांनी यांच्या निलंबनाबाबत ट्विट करत माहिती दिली. हैदराबाद शहर पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी काम करत आहे. मात्र, मीर चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सी. एच. सुधाकर यांच्या गैरवर्तनामुळे एका सामान्य नागरिकाला इजा झाली आहे. त्यामुळे, त्यांना निलंबित करण्यात येत आहे.
-
Mirchowk Constable officer Ch Sudhaker is placed under suspension for his unprofessional conduct which caused injury to a civilian. Hyd city police remain committed to safety, security and dignity of a common man.
— Anjani Kumar, IPS, Stay Home Stay Safe. (@CPHydCity) April 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mirchowk Constable officer Ch Sudhaker is placed under suspension for his unprofessional conduct which caused injury to a civilian. Hyd city police remain committed to safety, security and dignity of a common man.
— Anjani Kumar, IPS, Stay Home Stay Safe. (@CPHydCity) April 28, 2020Mirchowk Constable officer Ch Sudhaker is placed under suspension for his unprofessional conduct which caused injury to a civilian. Hyd city police remain committed to safety, security and dignity of a common man.
— Anjani Kumar, IPS, Stay Home Stay Safe. (@CPHydCity) April 28, 2020
-
HG Hanumantu of PS Golconda is placed under suspension for unprofessional conduct. SHO Golconda is given a charge memo for not properly briefing his subordinates in discharge of duties.
— Anjani Kumar, IPS, Stay Home Stay Safe. (@CPHydCity) April 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">HG Hanumantu of PS Golconda is placed under suspension for unprofessional conduct. SHO Golconda is given a charge memo for not properly briefing his subordinates in discharge of duties.
— Anjani Kumar, IPS, Stay Home Stay Safe. (@CPHydCity) April 28, 2020HG Hanumantu of PS Golconda is placed under suspension for unprofessional conduct. SHO Golconda is given a charge memo for not properly briefing his subordinates in discharge of duties.
— Anjani Kumar, IPS, Stay Home Stay Safe. (@CPHydCity) April 28, 2020
यासोबतच, आयुक्तांनी गोळकोंडा पोलीस ठाण्याचे होमगार्ड हणुमंतु यांच्या निलंबनाबाबतही ट्विट करत माहिती दिली. पोलीस करत असलेल्या अमानुष मारहाणीबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.
दरम्यान, देशभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३१ हजारांच्या पुढे गेली आहे. तर, देशातली कोरोनाच्या बळींची संख्याही हजारावर पोहोचली आहे. तसेच, तेलंगाणामधील कोरोनाचा संसर्ग झालेल्या नागरिकांची संख्या एक हजारांवर पोहोचली असून, राज्यात आतापर्यंत एकूण २६ बळींची नोंद झाली आहे.
हेही वाचा : केरळ सरकारच्या वेतन कपात निर्णयाला न्यायालयाची स्थगिती