अलीपूरदुर (पश्चिम बंगाल) - जागतिक हत्ती दिनी दोन हत्तीच्या मृत्यूची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. मृतांमध्ये एका पिल्लाचा समावेश आहे.
या घटनेची मुख्य वनाधिकारी रविकांत सिन्हा यांनी दिलेली माहिती अशी, की पश्चिम बंगालमधील उत्तर-पूर्व बंगालच्या दुअर्स क्षेत्रातील बुक्सा टायगर रिझर्व्ह भागात बुधवारी हत्ती व पिल्लाचा मृत झाल्याचे समोर आले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
2012 पासून जगात 12 आगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आफ्रिकन आणि आशियाई हत्तीच्या विकासाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी साजरा केला जातो.