नागौर - मागास समाजातील दोन तरुणांना त्यांच्या मित्रांनी मारहाण करून ठार केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. ही घटना दारू पिऊन भांडण झाल्यानंतर घडल्याचे समजते.
दोन तरुण आणि त्यांच्या मित्रांमध्ये दारू पिल्यानंतर एका विषयावरून बाचाबाची झाली होती. यावेळी मागास समाजातील तरुणांना त्यांच्या मित्रांनी काठ्यांनी झोडपून ठार केले.
डीडवानाचे पोलीस अधीक्षक नितेश आर्य आणि गच्छीपुरा पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. सध्या पोलीस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत आहेत.