नवी दिल्ली : शहरातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी करणाऱ्यांना दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे २० लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे रियाधहून आले होते. त्यांच्याकडून सोन्याच्यी चार बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. या सोन्याचे एकूण वजन ४०६ ग्रॅम असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यानंतर, कस्टम अॅक्टच्या कलम ११० नुसार हे सोने जप्त करण्यात आले आहे. तर, कलम १०४नुसार या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.