सिकर - जिल्ह्यातील शेखपुरा मोहल्ल्यात घरघुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये १२ जण जखमी झाले असून, ४ जणांची स्थिती गंभीर आहे. जखमींवर जयपूरमधील रुग्णायात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी फेर निवड, तर मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढांवर कायम
हेही वाचा - लखनौ न्यायालयात बॉम्ब हल्ला, सहसचिवांसह काही वकील जखमी
आज (गुरुवार) सकाळीच नवीन सिलिंडर घरात बसवला होता. जेवण तयार करण्यासाठी गॅस चालू केला असता, अचानक त्याचा स्फोट झाला. या स्फोटाने आसपासचा परिसरही हादरुन गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नगरपरिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.