ETV Bharat / bharat

दिल्लीत उद्यापासून धावणार मेट्रो, परिवहनमंत्र्यांनी केली पाहणी - Rajiv chowk metro station

उद्यापासून (7 सप्टें.) दिल्लीत मेट्रो धावणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे परिवहनमंत्री कैलाश गहलोत यांनी राजीव चौक मेट्रो स्थानकाला भेट दिली व आढावा घेतला.

metro
मेट्रो
author img

By

Published : Sep 6, 2020, 6:05 PM IST

Updated : Sep 6, 2020, 6:57 PM IST

नवी दिल्ली - कोरोना काळात पाच महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली मेट्रो पुन्हा सुरू होणार आहे. उद्यापासून (7 सप्टेंबर) येलो लाइनवरील मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. यावेळी कोरोनाबाबतची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. याबाबत पाहणी करण्यासाठी दिल्लीचे परिवहनमंत्री कैलाश गहलोत यांनी आज (दि. 6 सप्टें.) राजीव चौक मेट्रो स्थानकाला भेट दिली.

आढावा घेताना प्रतिनिधी व माहिती देताना मंत्री गहलोत

फक्त दोनच गेट उघडणार -

राजीव चौक मेट्रो स्थानकातील फक्त दोन गेट उघडण्यात येणार आहेत. 7 नंबर गेटमधून प्रवासी येऊ शकतात व बाहेर पडण्यासाठी 6 नंबरचा गेट सुरू राहणार आहे. कैलाश गहलोत यांनी निरीक्षणावेळी सोशल डिस्टंसिंगसाठी कोणत्या सुविधा आहेत, लिफ्ट तसेच सॅनिटायझरबाबतची पाहणी केली.

सॅनिटायझेशनवर भर -

निरीक्षणावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना परिवहनमंत्री म्हणाले की, मेट्रो प्रवासादरम्यान मास्क, थर्मल स्क्रीनिंग व सामाजिक अंतर या सर्व बाबींवर लक्ष दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात उद्या (दि. 7 सप्टें.) फक्त येलो लाइनवरील मेट्रो सुरू होईल. मेट्रोचे डबे सॅनिटाइझ करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सकाळी व सायंकाळी 4-4 तासांसाठी मेट्रो चालवली जाईल, अशी माहिती कैलाश गहलोत यांनी दिली.

12 सप्टेंबरपासून पूर्णपणे कार्यान्वित होईल मेट्रो -

कोरोना काळात मेट्रो सुरू करणे हे सर्वांसाठी आव्हानात्मक आहे. पण, हळू-हळू सर्व पूर्वपदावर येईल व 12 सप्टेंंबरपर्यंत दिल्लीतील मेट्रो पूर्णपणे कार्यान्वित होईल, असा विश्वास मंत्री गहलोत यांनी व्यक्त केला.

फक्त मेट्रो कार्डने प्रवास करू शकतील प्रवासी

मंत्री कैलाश गहलोत म्हणाले, जर कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले तर, कारवाई केली जाणार आहे. मेट्रो प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या टोकनवर पूर्णपणे बंदी असेल. प्रवासी फक्त कार्डच्या सहाय्यानेच मेट्रोचा प्रवास करू शकतील.

Last Updated : Sep 6, 2020, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.