LIVE:
- पंजाब: अमृतसरमध्ये आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या दिला
- सरकारविरोधी कामगार संघटनांचे आंदोलन दिल्लीतही सुरू व्यापारी संघटनांची भारत बंदची हाक
- पश्चिम बंगाल राज्यातील कूच बिहार जिल्ह्यात आंदोलकांनी बसची तोडफोड केली. तोंड बांधलेल्या आंदोलकांनी बस थांबवून दगडफेक केली. यावेळी बसमधील प्रवासी जीव मुठीत धरून बाहेर पडले.
-
Punjab: Protesters block a railway track in Amritsar during #BharatBandh call by ten trade unions https://t.co/DhtkLCjiFC pic.twitter.com/lZfdAWygXd
— ANI (@ANI) January 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Punjab: Protesters block a railway track in Amritsar during #BharatBandh call by ten trade unions https://t.co/DhtkLCjiFC pic.twitter.com/lZfdAWygXd
— ANI (@ANI) January 8, 2020Punjab: Protesters block a railway track in Amritsar during #BharatBandh call by ten trade unions https://t.co/DhtkLCjiFC pic.twitter.com/lZfdAWygXd
— ANI (@ANI) January 8, 2020
-
- केरळमधील तिरुअंनतरपूरम येथे भारत बंद आंदोलन सुरू आहे. दहा संघटनांनी भारत बंद आंदोलनात घेतला सहभाग
- पंजाब - पटीयालामधील पंजाब विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार आंदोलक विद्यार्थ्यांनी बंद करून प्रदेशद्वारावर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
-
A protest march underway in Delhi. Ten trade unions have called for #BharatBandh today against 'anti-worker policies of Central Govt' pic.twitter.com/9izGlmbAvp
— ANI (@ANI) January 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A protest march underway in Delhi. Ten trade unions have called for #BharatBandh today against 'anti-worker policies of Central Govt' pic.twitter.com/9izGlmbAvp
— ANI (@ANI) January 8, 2020A protest march underway in Delhi. Ten trade unions have called for #BharatBandh today against 'anti-worker policies of Central Govt' pic.twitter.com/9izGlmbAvp
— ANI (@ANI) January 8, 2020
-
- बंगाल राज्यात अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुरू आहे.
- बंगाल (सीलीगुडी)- कामगार विरोधी आंदोलनामुळे बंगालमधील बस सेवा विस्कळीत. बस चालकांना हेल्मेट घालून बस चालवण्याची आली वेळ.
- पश्चिम बंगाल - कंचरपारा, नार्थ २४ परगणा येथे आंदोलकांनी रेल्वे सेवा बंद पाडली.
- पश्चिम बंगालमध्ये आंदोलकांनी हावडा आणि उत्तर परगना भागातील रेल्वे गाड्या अडवल्या आहेत. बस स्थानकावरही बस अडवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
- केरळमधील त्रिवेंद्रममध्येही आंदोलकांनी बंदची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या लोकविरोधी आणि कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून, देशभरातील कामगार संघटनांनी आज (बुधवार) बंद पुकारला आहे. या भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्या संघटनांची संख्या पाहता, आज साधारणपणे 25 कोटी कामगार संपावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशव्यापी संपात राज्यातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसोबत शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारे शिक्षक हे सहभागी होणार असल्याने मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये बंद राहण्याची शक्यता आहे.
कोणकोणत्या संघटना सहभागी?
आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएस, सीआयटीयू, एआयटीयूसी, टीयूसीसी, एसईडब्ल्यूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी या मुख्य कामगार संघटनांसह कित्येक प्रादेशिक संघटना या संपामध्ये सहभागी असणार आहेत. तर, शिवसेनेची कामगार संघटना, देशभरातील 60 विद्यार्थी संघटना, शिक्षक-प्राध्यापक संघटना हेदेखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. विद्यार्थी आणि प्राध्यापक संघटना या आपापल्या मागण्यांसाठी या बंदमध्ये सहभागी होतील. तसेच, देशभरातील 175 शेतकरी संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे.