चंदीगढ - सुंदर आणि नियोजित शहरांच्या यादीत चंदीगढचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. चंडी मंदिर आणि गढी किल्ल्यावरून शहराचे नाव चंदीगढ पडले आहे. नगर रचना आणि बांधकामांमुळे हे भारताचे पहिले नियोजित शहर म्हणून ओळखले जाते.
सर्वोत्कृष्ट सहलीचे ठिकाण - जर आपण सुट्टी आणि सहलीला जाण्याच्या विचार करत असाल तर आपण चंदीगडला भेट देऊ शकता.
चंदीगढ हे भारत आणि आशियातील सुव्यवस्थित शहरांपैकी एक आहे, म्हणूनच त्याला 'द सिटी ऑफ ब्युटीफुल' देखील म्हटले जाते.
सुखना तलाव - चंदीगढमध्ये सुखना तलाव आहे. यामध्ये पर्यटक नौका विहारचादेखील आनंद घेऊ शकतात.
रॉक उद्यान - चंदीगढमधील सेक्टर 1 मधील रॉक उद्यान खुपच सुंदर आहे. पर्यटक येथे भेट देऊ शकतात. येथे काचेपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू आहेत.
सेल्फी स्पॉट - चंदीगढमध्ये म्युझियम आर्ट गॅलरीसमोर आयफेल टॉवर आहे. हा तरुणाईसाठी उत्तम सेल्फी स्पॉट आहे.
गुलाब उद्यान - ज्यांना गुलाब आवडतात त्यांच्यासाठी चंदीगढमधील झाकीर हुसेन गुलाब उद्यान हे एक सुंदर ठिकाण आहे. नवीन रंग पाहण्यासाठी गुलाब उद्यान चांगला पर्याय असू शकते.