चंडीगड - हरियाणा राज्यासह संपूर्ण भारतात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या 2300 च्या वर पोहोचली आहे. दुसरीकडे हरियाणामध्ये एकूण 30 कोरोनाच्या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
हेही वाचा... COVID-19 : केंद्रीय सुरक्षा बलाच्या आणखी 6 जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, एकूण 11 जण बाधित
हरियाणात आतापर्यंत आढळलेले कोरोनाचे रुग्ण...
हरियाणा राज्यामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. हरियाणामध्ये आता एकूण कोरोनाचे रुग्ण 44 झाले असून त्यापैकी 30 रुग्णांवर उपचार सुरु असून 14 रुग्ण बरे झाले आहेत.
हरियाणातील कोरोना रुग्णांची जिल्हावार माहिती...
- गुरुग्राममध्ये आतापर्यंत कोरोनाचे 15 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी केवळ 6 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर 9 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.
- सिरसा जिल्ह्यात 3 एप्रिलपर्यंत 3 रुग्ण
- अंबाला जिल्हात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत.
- हिसार जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण
- पानीपत जिल्ह्यात कोरोनाचे 4 रुग्ण
- फरिदाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळले आहेत
- पंचकुला जिल्ह्यात कोरोनाचे 2 रुग्ण
पलवलमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर एक रुग्ण पुर्ण बरा झाला आहे. याशिवाय रोहतकमध्येही कोरोनाचा रुग्ण आढळला होता. ही महिला 23 मार्च रोजी तिच्या माहेरी रोहतकमध्ये आली होती.