ETV Bharat / bharat

Top 10 @ 5 PM: सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर..

राज्यासह देश-विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

Top Ten News 5 pm
Top Ten News 5 pm
author img

By

Published : Oct 21, 2020, 6:06 PM IST

Updated : Oct 21, 2020, 6:46 PM IST

  • जळगाव - गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. आज एकनाथ खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी खालच्या स्तरावर राजकारण केल असून त्यांनी माझे जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असे एकनाथ खडसे म्हणाले. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

सविस्तर वाचा- देवेंद्र फडणवीसांनी माझे जीवन उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला, एकनाथ खडसेंचा घणाघात

  • नवी दिल्ली - केंद्र सरकारने दसरा दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. ३० लाख अराजपत्रित सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज कॅबिनेट बैठकीत घेतला. कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. 'डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर'द्वारे(डीबीटी) हे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड.. मोदी सरकारकडून ३० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस

  • नवी दिल्ली - आयपीएलच्या ३८व्या सामन्यानंतर लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत:कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.

सविस्तर वाचा- लोकेश राहुकडे 'ऑरेंज' तर, दिल्लीच्या गोलंदाजाकडे 'पर्पल' कॅप

  • कोलंबो - भारतीय क्रिकेटपटू मनप्रीत गोनी आणि मनविंदर बिस्ला पुढील महिन्यापासून सुरू होणार्‍या लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) पहिल्या हंगामात भाग घेतील. एलपीएल ड्राफ्टमध्ये लीगच्या पाच फ्रेंचायझींनी जगभरातील खेळाडूंना आपापल्या संघात समाविष्ट केले.

सविस्तर वाचा- लंका गाजवण्यासाठी 'हे' दोन भारतीय क्रिकेटपटू सज्ज

  • उस्मानाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल, मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मदत किती, कशी, कधी करायची, याबाबत विचार सुरू आहे. मुंबईत काम सुरू आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होत आले असून आढावा घेणे सुरू आहे. जी मदत करता येईल, ती केल्याशिवाय राहणार नाही. सणाच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

सविस्तर वाचा- पंचनामे पूर्ण होत आले असून, लवकरच मदतीची घोषणा करणार - मुख्यमंत्री

  • नवी दिल्ली - आजच्या पिढीमध्ये लग्नापूर्वी फोटोशूट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विविध भन्नाट कल्पना डोक्यात ठेऊन हे फोटोशूट केले जाते. बांगलादेशची महिला क्रिकेटपटू संजीदा इस्लामनेही असे एक भन्नाट फोटोशूट केले असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सविस्तर वाचा- महिला क्रिकेटपटूचे लग्नापूर्वी भन्नाट फोटोशूट..पाहा फोटो

  • औरंगाबाद - भाजपमध्ये एकाधिकारशाही वाढत चालली आहे. त्यामुळेच जुने नेते पक्षाला सोडून जात असल्याचा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपला लगावला आहे. राष्ट्रवादी पक्षात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासारखे चांगले नेते आहेत. ते एकनाथ खडसेंना सांभाळून घेतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. एकनाथ खडसेंनी आज भाजपला राजीनामा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना खैरे बोलत होते.

सविस्तर वाचा- 'एकाधिकारशाही वाढल्याने जुने नेते भाजपला सोडून जातात'

  • जळगाव - आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. नाथाभाऊंच्या निर्णयाचे आम्हाला दुःख आहे. पण, मी भाजपकडून निवडून आले आहे, मी भाजप सोडणार नाही. भाजपतच मी काम करत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर दिली. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सून आहेत.

सविस्तर वाचा- आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक, पण मी भाजप सोडणार नाही- रक्षा खडसे

  • मुंबई - संजय दत्तने आपण आजारातून बरा झालो असल्याचे ट्विट करून आपल्या चाहत्यांना कळवले आहे. त्याला कॅन्सर झाल्याचे निदान काही दिवसापूर्वी झाले होते. त्यानंतर तो उपचार घेत होता. आता या दुर्धर आजारातून मुक्त झाल्याचे त्याने कळवले आहे.

सविस्तर वाचा- बाबाच्या चाहत्यांना खुशखबर.. संजय दत्तने कॅन्सरवर केली मात, फॅन्सना म्हणाला..

  • मुंबई - काही वेळापूर्वीच नाथा भाऊंचा राजीनामा माझ्याकडे पोहोचला आहे. कितीही रागवले तरी नाथाभाऊ हे पाऊल उचलतील असे वाटले नव्हते. पण, काही ठरलेल्या गोष्टी असतात त्या टाळू शकत नाही. त्यांनी पक्षात राहावे, नेतृत्व करावे, असे आमची इच्छा होती. मात्र, असे होऊ शकले नाही. त्यांनी तिकडे जाऊन चांगले काम करावे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

सविस्तर वाचा- नाथाभाऊ गेल्याने पक्षाचे नुकसान होणार - चंद्रकांत पाटील

Last Updated : Oct 21, 2020, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.