- मुंबई - राज्यात आज (शुक्रवारी) कोरोना विषाणूची लागण झालेल्या १५ हजार ५९१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ४२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ लाख १६ हजार ५१३वर पोहचला आहे. तर एकूण मृतांची संख्या ३७ हजार ४८० इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के तर मृत्यूचा दर २.६५ टक्के इतका आहे.
सविस्तर वाचा : महाराष्ट्र कोरोना अपडेट : १५ हजार ५९१ नवीन रुग्णांचे निदान, ४२४ रुग्णांचा मृत्यू
- वर्धा - महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा संदेश देत सेवाग्राम गावाची वाट धरली. रामराज्याप्रमाणे त्यांनी ग्रामराज्य हा नवीन शब्द आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणे म्हणजे स्वातंत्र्य नाही. गांधीजींना बघण्यासाठी खेड्या पाड्यातील लोक गर्दी करायचे. त्या खेड्या पाड्यातील लोकांना विकास म्हणजे त्याचे आयुष्य सुखा-समाधानाने आनंदाने जगात यावे, म्हणून स्वातंत्र्य पाहिजे होते. यासाठी महात्मा गांधींच्या ग्राम स्वराज्याच्या संकल्पनेची आज गरज आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. महात्मा गांधीजीच्या 151व्या जयंती आणि सप्ताहानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते ऑनलाईन माध्यमातुन बोलत होते.
सविस्तर वाचा : 'महात्मा गांधीजींची ग्राम स्वराज्याची संकल्पना आजची गरज'
लखनऊ - हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाविरोधात राज्यात आणि संपूर्ण देशात आंदोलन होत आहे. दरम्यान, योगी सरकारने हाथरस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.
सविस्तर वाचा : हाथरस सामूहिक बलात्कार: पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन
- ठाणे - 'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ५० लाख रुपये देतो त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी,' अशी संतप्त प्रतिक्रिया हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे काकांनी उल्हासनगरमध्ये दिली आहे. योगी सरकारने पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत जाहीर केली, या आश्वासनावर आमचा विश्वास नसल्याचेही ते म्हणाले.
सविस्तर वाचा : '५० लाख रुपये देतो मुख्यमंत्री पद सोडा', हाथरस पीडितेच्या काकांचे मुख्यमंत्री योगींना आव्हान
- पुणे - राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी न्यायालयात गेले आहे. आणखी कुणी जात असेल तर, दहा जणांनी न्यायालयात जावे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आज दिली. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्विट केले होते. त्यांच्या भूमिकेवर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्तर वाचा : पार्थ यांच्या ट्विटवरून शरद पवारांनी 'ही' दिली प्रतिक्रिया
- पुणे- उत्तर प्रदेश पोलीस कायदा हातात घेऊन किती टोकाचे वागतात, हे हाथरसच्या घटनेच्या निमित्ताने समोर आले. उत्तर प्रदेश सरकारची भूमिका घृणास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
सविस्तर वाचा : 'हाथरसच्या घटनेत उत्तर प्रदेश सरकारची भूमिका घृणास्पद'
- नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका 19 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. मंगळवारी उपचारादरम्यान पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही हाथरस प्रकरणाची दखल घेतली असून उत्तर प्रदेशमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी स्वागत केले. न्यायालयाचा हा निर्णय पीडित कुटुंबासाठी आशेचा किरण आहे, असे त्या म्हणाल्या.
सविस्तर वाचा : हाथरस प्रकरण : उत्तर प्रदेश प्रशासनाला अलाहाबाद न्यायालयाचा दणका
- हैदराबाद - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमेरिका, यूके, जपान, सिंगापूर, इटली, फ्रान्स, रशिया, स्पेन, भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. अनेक देशांच्या प्रमुखांना कोरोनाची बाधा झाली आहे.
सविस्तर वाचा : जगातील 'या' बड्या राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण
- नागपूर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज (शुक्रवारी) 151वी जयंती आहे. यानिमित्ताने प्रत्येक भारतीयांना आपल्या-आपल्यापरीने आदरांजली अर्पण करत आहे. नागपूर येथील महामेट्रोकडून गांधी जयंती निमित्ताने विशेष आयोजन करण्यात आले आहे. याकडे नागपूरकरांचे लक्ष वेधले गेले आहे.
सविस्तर वाचा : महात्म्याचे अनोखे स्मरण : नागपूर एअरपोर्ट मेट्रो स्टेशन बनले 'बापू कुटी'!
- पणजी - संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सामन्यांवरील सट्टेबाजीसाठी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गोवा बीच व्हिला येथे छापा टाकून राजस्थानच्या चार आणि एका नेपाळी नागरिकास अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
सविस्तर वाचा : आयपीएल सट्टेबाजी : गोव्यात पाच जणांना अटक