- नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या वर पोहोचली आहे. काल एका दिवसभरात झालेल्या वाढीनंतर, आता देशातील एकूण रुग्णांची संख्या ५२,९५२ वर पोहोचली आहे. यामधील ३५,९०२ रुग्ण अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत १५,२६६ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या १,७८३ आहे.
सविस्तर वाचा : देशातील कोरोना रुग्णांनी ओलांडला ५० हजारांचा टप्पा; आतापर्यंत झालेत १,७८३ मृत्यू..
- मुंबई - कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाबाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत उघडकीस आणला आहे.
सविस्तर वाचा : धक्कादायक! कोरोना मृतदेहांच्या बाजूला रुग्णांवर उपचार, सायन रुग्णालयातील प्रकार
- मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16 हजार 758 झाली आहे. बुधवारी राज्यात नवीन 1 हजार 233 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर 275 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3 हजार 94 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सविस्तर वाचा : राज्यात नवीन 1233 रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या 16 हजार 758
- विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीतील विषारी वायू गळती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना आज सकाळी घडली. यानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. एका लहान मुलासह आठ जणांचा यात मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि नौदलाने कारखान्याजवळील गावे रिकामी केली आहेत.
सविस्तर वाचा : विशाखापट्टणम वायू गळती LIVE : स्टायरीन वायूचा प्रभाव नाहीसा करण्यात यश, मुख्यमंत्र्यांनी घेतला घटनेचा आढावा..
- नागपूर- मध्यप्रदेशला नागपूरमार्गाने पायी जात असलेल्या एका मजुराच्या पत्नीची नागपुरात प्रसूती झाली आहे. भररस्त्यात प्रसूती कळा येताच अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मदतीला धावल्याने त्या महिलेची रुग्णालयात सुखरुप प्रसूती झाली आहे.
सविस्तर वाचा : लाॅकडाऊन: मुंबईहून उत्तरप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...
- औरंगाबाद - शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील एका पोलीस निरीक्षकाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आला. त्यामुळे पोलीस निरीक्षक राहत असलेल्या इमारतीमधील सुमारे ५० ते ६० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा : पोलीस निरीक्षकाच्या मुलाला कोरोनाची लागण
- नवी दिल्ली - कोरोना संचारबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. मात्र, लवकरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येईल, असे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा घेण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळले जातील, असेही ते म्हणाले. बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडेरशन ऑफ इंडियाच्या सदस्यांसोबत आज गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
सविस्तर वाचा : 'सर्व खबरदारीसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लवकरच सुरू करणार'
- मुंबई - कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला सध्या किमान पाच दिवस क्वारंटाईन करण्यात येते. मात्र पालिकेच्या नायगाव प्रसूतिगृहात भलताच प्रकार उघडकीस आला आहे. या प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून २४ तास उलटण्यापूर्वीच कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण न करताच हजर राहिल्याने त्या आणि इतरही कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
सविस्तर वाचा : पालिका कर्मचारी फक्त २४ तास क्वारंटाईन; तातडीने कामावर येण्याचा फतवा
- मुंबई - कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. या परिस्थितीत लढण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. देशातील विविध विद्यापीठे, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांनी यावर विशेष संशोधन करण्यास सुरुवात केली. कोरोनासंदर्भातील हे संशोधन सर्वांना एकाच छताखाली उपलब्ध व्हावे आणि आपल्या अभ्यासाची दिशा ठरवण्यास मदत व्हावी यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक उपक्रम सुरू केला आहे.
सविस्तर वाचा : 'कोरोना आऊटब्रेक: स्टडी फ्रॉम होम'च्या माध्यमातून कोरोनावर होणार संशोधन!
- मुंबई - देशात लॉकडाऊनचा तिसरा ट्प्पा सुरू झाला आहे. मात्र, त्या अगोदर दारूविक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली. दोनच दिवसात एकट्या मुंबईतून दारूविक्रीमुळे ६५ कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, नागरिकांनी केलेल्या गोंधळामुळे दोनच दिवसांत मुंबईतील दारूविक्रीची दुकाने पुन्हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.
सविस्तर वाचा : दारू म्हणजे कोरोनाची लस नव्हे; संकटाचे भान ठेवा