- हैदराबाद- कर्जबुडव्या विजय मल्ल्याचे भारताला होणारे प्रत्यार्पण पुन्हा रखडणार आहे. कायदेशीर वाद सुटले नसल्याचे सांगत प्रत्यार्पण शक्य नसल्याचे ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
सविस्तर वाचा : ... म्हणून विजय मल्ल्याचे इंग्लंडकडून होणार नाही प्रत्यार्पण
- मुंबई - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच झाडांची पडझड झाली आहे. जनजीवन पूर्ण उद्ध्वस्त झाले. त्यामुळे केंद्र सरकारने पश्चिम बंगालप्रमाणे लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
सविस्तर वाचा : 'निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमध्ये मोठे नुकसान, केंद्र सरकारने पश्चिम बंगालप्रमाणे मदत जाहीर करावी'
- यवतमाळ - कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची मन:स्थिती ढासळलेली असते. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम यवतमाळमधील एक डॉक्टर तरुणी करत आहे. डॉ. टीना राठोड, असे तिचे नाव असून जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये जाऊन ती रुग्णांना योगाचे धडे देत आहे.
सविस्तर वाचा : 'ती' कोरोनाबाधितांचे वाढवतेय मनोबल, आयसोलेशन वार्डमध्ये देतेय योगाचे धडे
- रायगड - निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील नागरिक, शेतकरी उद्ध्वस्त झाला असून शासनाने यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
सविस्तर वाचा : कोकणाला विशेष पॅकेज जाहीर करा, प्रवीण दरेकरांची मागणी
- रायगड - निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्याच्या मुरुड समुद्रकिनारी धडकल्याने याचा फटका हा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्याला बसला आहे. या वादळाने खासगी आणि शासकीय मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा : निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम : रायगडमध्ये दोघांचा मृत्यू, वीजपुरवठा खंडीत
- लखनऊ - उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमध्ये तब्बल २८ मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावरील चाट खाल्ल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वाचा : रस्त्यावरचा चाट खाल्ल्याने २८ मुलांना विषबाधा..
- लखनऊ - उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून एकाची हत्या झाली आहे. झीशान असे मृत तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वाचा : प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराचा केला खून; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच प्रकरण उजेडात..
- चेन्नई - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्याला निलंबित करण्यात आले.
सविस्तर वाचा : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट केल्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्याचे निलंबन
- हाँगकाँग- आज हाँगकाँग विधिमंडळाने एक वादग्रस्त विधेयक मंजूर केले आहे. त्यानुसार हाँगकाँगच्या नागरिकांनी चीनच्या राष्ट्रगीताचा अवमान करणे कायदेभंग ठरणार आहे.
सविस्तर वाचा : हाँगकाँगमध्ये चीनच्या राष्ट्रगीताचा अपमान केल्यास 3 वर्षांचा कारावास
- जकार्ता - इंडोनेशियातील मकालू प्रांतात आज(गुरुवार) 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र समुद्राच्या आतमध्ये होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. मात्र, सुनामीचा धोका नसल्याचे हवामान आणि भुगर्भशास्त्र विभागाने सांगितले.
सविस्तर वाचा : इंडोनेशियाला 6.8 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, सुनामीचा धोका नाही