ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एकच्या ठळक बातम्या..

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news stories at one PM
Top 10 @ 1 PM : दुपारी एकच्या ठळक बातम्या..
author img

By

Published : May 10, 2020, 1:02 PM IST

  • मुंबई - विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दबाव असतानाही काँग्रेस आपला दुसरा उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत नाही. महाविकास आघाडीचे 6 उमेदवार असून त्यांना निवडून आणण्याचे नियोजन करत असल्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा - विधानपरिषदेची निवडणूक होणार, काँग्रेस दुसऱ्या उमेदवारीवर ठाम

  • मुंबई - कोरोनाविरोधात पोलीस आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करत आहेत. मात्र, हे करताना त्यांच्या स्वत:चा जीव धोक्यात आहे. राज्य पोलीस दलातील 786 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यात 88 पोलीस अधिकारी आणि 698 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा - चिंताजनक...राज्यात 786 पोलिसांना कोरोनाची लागण; 7 जणांचा मृत्यू

  • ठाणे - आपल्या गावाला जाण्याकरता शेकडो मजूर पायपीट करत जीवघेणा प्रवास करत आहेत. लोंढेच्या-लोंढे मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघत आहेत. त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी करुन या मजूरांना परत पाठवले. त्यानंतर रस्त्यावर पोलीस आडवतात म्हणून अनेक मजूर चक्क रात्रीच्या अंधारात नाल्यातून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा - गावाची ओढ...पोलीस अडवतात म्हणून परप्रांतीय मजुरांचा चक्क नाल्यातून प्रवास

  • हिंगोली- जन्मानंतर 'त्या तिघी' आईपासून दूर गेल्या. तिघींनी एकाच आईच्या पोटी एकाच वेळी जन्म घेतला होता. तिळ्या जन्मल्यामुळे वजन कमी होते. श्वास घ्यायला त्रास होत होता. जन्मानंतर लगेचच त्यांना हिंगोलीतल्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवले. मात्र, तिन्ही मुली झाल्याने त्यांची आई पुन्हा त्यांच्याकडे फिरकलीही नाही. या तिन्ही चिमुकल्यांना परिचारिकांनीच मायेचा ओलावा दिला.

सविस्तर वाचा - 'मदर्स डे' स्पेशल..! परिचरिकांनीच दिला 'त्या' तिळ्या चिमुकल्यांना मायेचा ओलावा

  • कोल्हापूर - नोकरीमुळे मुंबईत राहत असलेल्या प्रशांत आणि उज्वला कदम यांचा चार वर्षांचा मुलगा समर्थ, शाळेला सुट्टी असल्याने 16 मार्च रोजी कोल्हापुरातील उत्रे गावी आजोबांकडे आला. मात्र, पुढे नेमके काय होणार आहे, याची त्याला आणि घरातील कोणालाही कल्पना नव्हती.

सविस्तर वाचा - Mother's Day : मम्मा लवकर ये.. मला आठवण येतेय! 52 दिवसांपासून मायलेकांची ताटातूट

  • धुळे- अमळनेर येथील संभाव्य कोरोनाबाधिताची धुळ्यात कोरोना तपासणी करण्यात आल्यानंतर हा तरुण पॉझिटिव्ह असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले. मात्र, या कोरोनाबाधिताने रात्रीच धुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड मधून पळ काढला.

सविस्तर वाचा - धुळ्याच्या रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण पळाला.. अमळनेरपर्यंत धक्कादायक प्रवास

  • हिंगोली - कोरोना हा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा शेती माल हा अक्षरशः शेतात सडून गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. जिल्ह्यातल्या अशाच वरुड काजी येथील टरबूज उत्पादक शेतकऱ्याला कोरोनाच्या फाटक्यामुळे एक रुपयाप्रमाणे 1 हजार 200 टरबूज विकण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे.

सविस्तर वाचा - लॉकडाऊनचा परिणाम टरबुजाच्या पिकावर, शेतकऱ्याने विकले १ रुपयात एक टरबूज

  • रायपूर - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अजित जोगी कोमात गेल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील ४८ तास त्यांच्यावर कायम देखरेख ठेवण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी कोमात, डॉक्टरांनी दिली माहिती

  • तिरुवअनंतपूरम - मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन नौदलाचे INS जलाश्व जहाज कोची बंदरात दाखल झाले आहे. ६९८ भारतीयांना घेऊन जहाज माघारी आले आहे. नौदलाने याबाबत माहिती दिली आहे. या प्रवासांमध्ये १९ गर्भवती महिला आहेत. भारताने परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी माघारी आणण्यासाठी 'ऑपरेशन समुद्र सेतू' सुरू केले आहे.

सविस्तर वाचा - मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन INS जलाश्व कोची बंदरात दाखल

  • नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे मोठा अपघात झाला आहे. शनिवारी रात्री ट्रक पलटी झाल्यामुळे पाच स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे मजूर तेलंगणातील हैदराबाद येथून उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी जात होते.

सविस्तर वाचा - मध्य प्रदेशात ट्रक पलटी झाल्यामुळे 5 स्थलांतरित मजुरांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.