- विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीतील विषारी वायू गळती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. एका लहान मुलासह नऊ जणांचा यात मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा : विशाखापट्टणम वायू गळती LIVE : मृतांची संख्या पोहोचली ९ वर, आतापर्यंत ८०० लोक रुग्णालयात भरती..
- मुंबई- कोरोना व्हायरसचे संक्रमन थांबविण्यासाठी सर्व स्तरातून उपाययोजना केल्या जात असताना एक चिंतेची बातमी समोर येत आहे. राज्यात लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे म्हणून रस्त्यावर 24 तास पहारा देणाऱ्या राज्य पोलीस खात्यातील 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
सविस्तर वाचा : चिंताजनक..! राज्यात 531 पोलीसांना कोरोना; 51अधिकाऱ्यांचाही समावेश
- मुंबई - विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते तसेच इतर सर्व प्रमुख राजकीय पक्ष नेते यांच्यासोबत आज (गुरुवार) दुपारी २ वाजता मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणार आहे. यात राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सविस्तर वाचा : मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; फडणवीसांसह राज ठाकरेंनाही निमंत्रण
- मुंबई - शहरातील आर्थर रोड कारागृहात 50 वर्षीय कैदी कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्या कैद्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहातील 150 जणांची वैद्यकीय चाचणी जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतली. यात काही जेल कर्मचारी, स्वयंपाकी आणि कैद्यांचा समावेश आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या चाचणीच्या अहवालानंतर कारागृहात कोरोना संक्रमण कुठपर्यंत पोहचले आहे, हे स्पष्ट होणार आहे.
सविस्तर वाचा : 'त्या' कैद्यामुळे आर्थर रोड कारागृहातील 150 जणांची कोरोना चाचणी
- मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. मात्र, अशातच शिवडी पूर्व येथे एका हातगाडीवर कचराकुंडीत फेकलेला भाजीपाला आणि द्राक्षे विकून नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी घडला. एका सतर्क नागरिकामुळे ही सर्व घटना उघडकीस आली. त्यानंतर संबंधित विक्रेत्याने तो भाजीपाला कचराकुंडीत फेकून दिला.
सविस्तर वाचा : मुंबईत कचराकुंडीतील भाजीपाला विकून नागरिकांच्या जीवाशी खेळ, स्थानिकांच्या सतर्कतेने उघडकीस आला प्रकार
- नवी दिल्ली - बुद्ध पौर्णिमेनिमित्त आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या सहकार्यातून सांस्कृतिक मंत्रालयात आज कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. यावेळी मोदींनी देशवासियांना बौद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
सविस्तर वाचा : 'कठीण परिस्थितीचा सामना करून त्यावर विजय मिळवला पाहिजे, ही बुद्धांची शिकवण'
- मुंबई- देशभरात 22 मार्चपासून लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवेची दुकानेच उघडली जात आहेत. त्यातच अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या आरोग्य आणि आयटी क्षेत्रातील यंत्रे बिघडल्याने दुरुस्त करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळाव्यात म्हणून इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरच्या दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
सविस्तर वाचा : आरोग्य,आयटी सेवेतील यंत्रे बिघडल्याने इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअरची दुकाने उघडण्यास परवानगी
- मुंबई : 'महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजारात आजमितीला कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे त्याला उठाव नाही. अनुकूल वातावरणामुळे रब्बी हंगामातही कांद्याचे उत्पादन वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर, यावर्षी झालेले कांद्याचे जादा उत्पादन, वाढलेली आवक, कोरोनामुळे ठप्प असलेला उठाव या बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी यंदा निश्चित केलेली ४० हजार मेट्रिक टनांची मर्यादा वाढवून ५० हजार टनांपर्यंत करावी' अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना पत्राद्वारे केली आहे.
सविस्तर वाचा : कांदा खरेदीची मर्यादा ५० हजार टनांपर्यंत वाढवा ! अजित पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
- नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने सर्वात मोठे 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत विविध देशांमध्ये ६४ विमानसेवा सुरू करण्यात येणार आहेत. आजपासून(गुरुवार) हे मिशन सुरू होत आहे. दिल्ली ते सिंगापूर अशी फ्लाईट आज रात्रीपासून सुरू होत आहे.
सविस्तर वाचा : 'मिशन वंदे भारत': पहिला टप्पा आजपासून सुरू; सिंगापूरमध्ये अडकलेले नागरिक मायदेशी आणणार
- पणजी : दक्षिण गोव्यातील नेत्रावळी अभयारण्यात बुधवारी ब्लॅक पॅन्थर दिसून आला आहे. या संदर्भातील माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीटरद्वारे जनतेला दिली आहे. सोबत त्याचे छायाचित्रही पोस्ट केले आहे.
सविस्तर वाचा : गोव्यातील नेत्रावळी अभयारण्यात आढळला ब्लॅक पॅन्थर, मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन दिली माहिती