सध्या लॉकडाऊनमुळे शिक्षणव्यवस्था ठप्प झाली आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ कधी पूर्ववत होणार? अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी होणार? यासह अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनाही पडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकार काय उपाययोजना करत आहे? फी-संदर्भात सरकारचे धोरण काय? यासह अनेक मुद्यांवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला आहे. पाहा ही विशेष मुलाखत.
सविस्तर वाचा : 'ईटीव्ही भारत' विशेष: 'विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे'
मुंबई - भारताची युवा स्टार नेमबाज मनू भाकर हिने 'ईटीव्ही भारत'शी खास बातचित केली. यात तिने लॉकडाऊनमध्ये असलेले तिचे दिवसभराचे शेड्युल सांगितले. याशिवाय तिने टोकियो ऑलिम्पिक विषयावर मत मांडले. खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या हरियाणाच्या मनूने, नेमबाजी म्हणजे फक्त उभे राहून गोळी चालवणे असा नाही, तर यासाठी शरीराचे बॅलेन्स राखणे गरजेचे असल्याचे सांगितले. या सारख्या आणखी काय गोष्टी तिने ईटीव्ही भारतशी बोलताना दिलखुलास पणे मांडल्या आहेत.. पाहा ही खास बातचित...
सविस्तर वाचा : Exclusive : भारताची शूटींग 'क्वीन' मनू भाकरशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित
नवी दिल्ली - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने देशभरात दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन केला. या लॉकडाऊननंतर आता केंद्र सरकार निर्बंध हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले.
सविस्तर वाचा : Mann Ki Baat : आत्मनिर्भर भारत अभियान या दशकात देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल - मोदी
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या शेकडो उत्तरपत्रिका टाळेबंदीमुळे विविध ठिकाणच्या पोस्ट कार्यालयात आणि शाळांमध्ये अडकून पडल्या आहेत. तब्बल 55 टक्क्यांहून अधिक उत्तरपत्रिका या अशा प्रकारे अडकल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सविस्तर वाचा : निकाल लांबणार..? दहावीच्या उत्तरपत्रिका पोस्टात, तर बारावीच्या अडकल्या शाळेत
नागपूर - पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्य प्रदेश मार्गे राज्यात आलेल्या टोळधाडींनी नागपूरसह विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला. या कीटकांनी संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले आहे. ज्या भागात टोळधाडीचा हल्ला झाला आहे, त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहून टायरचा धूर केला, बँड वाजवला किंवा फटाके फोडले तर हा धोका कमी होऊ शकतो, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
सविस्तर वाचा : टायरचा धूर करा, बँड वाजवा, फटाके फोडा आणि टोळधाड पळवा - गृहमंत्री
बुलडाणा - खामगावातील बड्डे प्लॉट येथे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृतदेह शनिवारी (दि. 30 मे) सायंकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विद्युत झटका लागून या चौघांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सविस्तर वाचा : लग्ना आधीच विघ्न..! एकाच कुटुंबातील चौघांचे आढळले मृतदेह, दोघा भावी नवरदेवांचा समावेश
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्याविरोधात एन्काऊंटर ऑपरेशन सुरू केले आहे. यात अनंतनागच्या पोशक्रीरी परिसरात आज पहाटे (रविवार) सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू झाली आहे.
सविस्तर वाचा : जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय जवान आणि दहशतवांद्यामध्ये चकमक
केप कॅनावेरल - अमेरिकन स्पेस एजंन्सी नासाने फ्लोरिडा येथील केप कनवरल स्थित जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून नासा-स्पेसएक्स डेमो-2 मिशन हे अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले आहे.
सविस्तर वाचा : दोन अंतराळवीरांसह स्पेसएक्सचे 'द क्रू ड्रॅगन' अंतराळयान अवकाशात झेपावले
मिनिआपोलिस - जॉर्ज फ्लॉईड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांकडून बळी गेल्यानंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये आगडोंब उसळला आहे. आंदोलकांनी दुकानांना आग लावल्याचे निर्दशनास येत असून दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. मिनिसोटा राज्यातील मिनियापोलिस शहरात सुरू झालेला हिंसाचार आता लॉस एंजेलिस शहरापर्यंत पोहोचला आहे.
सविस्तर वाचा : जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत आगडोंब, वाचा संपूर्ण प्रकरण...
मुंबई - बीसीसीआयने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे. बीसीसीआय दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी पाठवत असते.
सविस्तर वाचा : 'खेलरत्न'साठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस, वाचा BCCI ने सुचवलेली नावं