रायपूर - छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते ७४ वर्षांचे होते. २००० ते २००३ पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री होते. ९ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते कोमामध्ये होते.
सविस्तर वाचा - छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी कालवश!
नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढतच असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तसेच लॉकडाऊनचा चौथा टप्पाही 31 मे ला संपणार आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली आहे. बैठकीत कोरोना महामारी आणि लॉकडाऊनवर आढावा घेण्यात येत आहे.
सविस्तर वाचा - 31 मे नंतर लॉकडाऊनबाबत काय असणार रणनीती ? मोदी-शाह यांची महत्त्वपूर्ण बैठक
नवी दिल्ली - मोठे उद्योग, स्टार्टअप्स आणि शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्थांसह कमीतकमी 30 गट कोविड-19 वरील लस शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत, असा दावा भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) डॉ. के. विजय राघवन यांनी गुरुवारी केला.
सविस्तर वाचा - कोविड -19 वरील लस शोधण्यासाठी 30 भारतीयांचा गट कार्यरत - डॉ. राघवन
मुंबई - कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी मुंबईकरांसाठी आहे. मध्यरात्री तीन वाजता तातडीने ज्या दीड महिन्याच्या बाळाच्या मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्या बळाने अखेर कोरोनावर मात केली आहे. बाळाचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आज त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती सायनमधील डॉक्टरांनी दिली असून यावर आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे.
सविस्तर वाचा - मेंदूची शस्त्रक्रिया झालेल्या त्या दीड वर्षांच्या बाळाची कोरोनावर मात
नाशिक - शहराच्या मध्यवर्ती कॉलेज रोड या भागात नागरिकांना सकाळच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं आहे. या बिबट्याने घरकाम करणाऱ्या एका महिलेला जखमी केलं असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सविस्तर वाचा - नाशिकमध्ये कॉलेज रोड भागात बिबट्याचा वावर; शहरात दहशत
नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ असून होत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखाच्या पुढे गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतामध्ये 7 हजार 466 कोरोनाबाधित आढळले असून 175 जणांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा - COVID-19 : भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर..
मुंबई - समाजवादी पक्षाचे आमदार अबू अझीम आझमी यांच्याशी वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुरुवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांची बदली झाली. हा व्हिडिओ समोर आल्याच्या एका दिवसानंतर शर्मा यांची बदली झाली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांचा प्रवासी कामगारांच्या प्रश्नावर आझमी यांच्यासोबत वाद झाला होता.
सविस्तर वाचा - आमदार अबू आझमी यांच्याशी वादानंतर मुंबई पोलीस अधिकारी शर्मा यांची बदली
नवी दिल्ली - कोरोना महामारी जगभरातून कधी जाणार, याबाबद अद्याप अनिश्चितता आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभरातील अर्थव्यवस्थांना टाळे लागणार असल्याचे मॅकन्झी आणि कंपनीने म्हटले आहे. लोकांचे जीवन, उदरनिर्वाह आणि विश्वास पूर्ववत करायला पाहिजे, असे मत मॅकन्झीने अहवालात व्यक्त केले आहे.
सविस्तर वाचा - 'कोरोना संपणार नसल्याच्या अनिश्चिततेने अर्थव्यवस्थांनाच लागणार मोठे टाळे'
मुंबई - भारतीय क्रिकेट संघ विदेशी खेळपट्टीवर आपला पहिला 'डे-नाईट' कसोटी सामना खेळणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) 3 ते 7 जानेवारी 2021 ला हा सामना रंगणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवार भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले.
सविस्तर वाचा - विदेशी खेळपट्टीवर भारत खेळणार पहिला डे-नाईट कसोटी सामना
नवी दिल्ली - अनुष्का शर्माची डिजिटल पदार्पण मालिका 'पाताल लोक' जितकी लोकांना आवडली आहे, तितकीच ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तसेच बरेच गट याचा तीव्र विरोध करत आहेत. अलीकडे, या वादाबद्दल भारतीय जनता पक्षाने कोणतीही अधिकृत नाराजी व्यक्त केलेली नाही. परंतु, आता वेगवेगळे धार्मिक समुदाय तसेच अनेक भाजप नेते खुलेआम विरोध दर्शवित आहेत.
सविस्तर वाचा - 'पाताल लोक'वर अनेक गट नाराज, अनुष्काला होतोय कडाडून विरोध