- मुंबई - महाराष्ट्रातील महामारीचा वाढता विळखा आणि प्रशासनाचे कार्य याबाबत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी 'ईटीव्ही भारत'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील तसेच देशभरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात दोन्ही सरकारांना अपयश आल्याची टीका केली.
सविस्तर वाचा - 'ईटीव्ही भारत' विशेष मुलाखत: 'मुंबईतील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्यासाठी शिवसेना जबाबदार'
- नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखाच्या पुढे गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतामध्ये 6 हजार 566 कोरोनाबाधित आढळले असून 194 जण कोरोनाचे बळी गेले आहेत.
सविस्तर वाचा - COVID-19 : भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 58 हजार 333
- नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना गुडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल
- श्रीनगर - जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट उधळून लावला. पुलवामाजवळ एका कारमध्ये इंप्रोवाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) ठेवण्यात आले होते. सुरक्षा दलाने वेळीच आयईडी निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला.
सविस्तर वाचा - पुलवामामध्ये टळला मोठा दहशतवादी हल्ला; कारमधून स्फोटके जप्त
- नवी दिल्ली - आज जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा मोठा घातपाचा कट हाणून पाडला. यानंतर मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत माहिती दिली.
सविस्तर वाचा - पुलवामा स्फोटक जप्त प्रकरणी डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली माहिती
- मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी आकडेवारी दिली. ती सरकारची अधिकृत आकडेवारी आहे. आकडेवारी जर खोटी असेल तर ती तुम्हाला सरकार दरबारी तपासता येईल, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.
सविस्तर वाचा - 'महाविकास आघाडीने दिलेली आकडेवारी सरकार दरबारी तपासा'; फडणवीसांना अनिल परब यांचे प्रत्युत्तर
- मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत आजही मजुरांची प्रचंड गर्दी दिसत आहे. गावाला जाण्यासाठी हजारो मजूर कुटुंबासह सामान घेऊन धारावीच्या रस्त्यावर आले आहेत. श्रमिक रेल्वेतून जाण्यासाठी हे मजूर स्टेशनपर्यंत जाणाऱ्या बसची सकाळपासून वाट आहेत.
सविस्तर वाचा - रेल्वेसाठी धारावीत मजुरांची गर्दी; 'फिजिकल डिस्टन्सिंग'करिता पोलिसांची दमछाक
- इंदूर - बाबा रामदेव यांच्या मालकीच्या पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टने कोराना रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांची चाचणी करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारकडे परवानगी मागितली आहे. याप्रकरणी इंदूरच्या जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यांनतर काँग्रेसने पतंजलीच्या औषधाला विरोध केला आहे.
सविस्तर वाचा - कोरोनावरील पंतजलीचे आयुर्वेदिक औषध चाचणीपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात
- रांची - कोरोनोवर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या स्थलांतरीत कामगारांचे हाल होत आहे. या काळात काही स्थलांतरीत कामगारांना मुंबईतून विमानाने घरी पाठवण्यात आले होते.
सविस्तर वाचा - विमान प्रवासाने मजूर झारखंडमध्ये दाखल, मजुरांनी 'लॉ कॉलेज'च्या माजी विद्यार्थ्यांचे मानले आभार
- नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बदायू शहरातील एका दाम्पत्याच्या पोटी सयामी जुळ्या मुलींचा जन्म झाला. त्यांची शरीरे एकमेकींना जोडलेली होती. त्यांचे गुदद्वार, गर्भाशय, पाठीचा कणा एकच होते. अशा मुलींवर एम्सच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.
सविस्तर वाचा - 24 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सयामी जुळ्यांना करण्यात आले वेगळे; एम्सच्या डॉक्टरांची कमाल