- नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 90 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 5 हजार 242 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 157 जण दगावले आहेत. आतापर्यंत 24 तासांत बाधित रुग्ण आढळलेला हा सर्वांत मोठा आकडा आहे.
सविस्तर वाचा - गेल्या 24 तासात आढळले 5 हजार 242 कोरोनाबाधित, तर 157 जणांचा बळी
- मुंबई - दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज राज्यात नवीन २ हजार ३४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. राज्यात आज ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ७ हजार ६८८ रुग्ण बरे झाले आहेत.
सविस्तर वाचा - 'राज्यात नवीन २ हजार ३४७ कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण संख्या ३३ हजार ५३'
- मुंबई - रविवारी (१७ मे)रात्री साडे अकराच्या सुमाराला ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन झाले. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज रुग्णालयात चेकअपसाठी अॅडमिट झाले असताना त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली, जी पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे निधन झाले.
सविस्तर वाचा - ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन
- मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी (१७ मे) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर कला क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील मंडळींनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
सविस्तर वाचा - रत्नाकर मतकरी यांचं निधन चटका लावून जाणारं, शरद पवार यांच्यासह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धाजंली
- सातारा - छत्रपती घराण्याचे आराध्य दैवत शिखर शिंगणापुरातील महादेव मंदिर . . कोरानाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला सहकार्य करत लाखो भाविकांचे शिखर शिंगणापूर हे त्यांच्या खासगी मालकीचे मंदिर 25 मार्चपासून बंद केले आहे. या ठिकाणी फक्त पूजा नित्यनियमितपणे सुरू आहे. या मंदिराची अख्यायिका खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी.
सविस्तर वाचा - छत्रपती घराण्याचे दैवत शिखर शिंगणापूर मंदिराचा इतिहास, पाहा ईटीव्ही भारतवर
- मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेले नऊ नवनिर्वाचित सदस्य आज दुपारी 1 वाजता शपथ घेतील. ठाकरे यांची 14 मे रोजी विधानसभेवर बिनविरोध निवड झाल्याने सत्ताधारी महाविकासआघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.
सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार अधिकृत आमदार, दुपारी एक वाजता घेणार शपथ
- औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. 48 दिवसात शहरात हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी सकाळी 59 नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या 1021 वर पोहोचली आहे.
सविस्तर वाचा - धक्कादायक; औरंगाबादेत कोरोना रुग्णांनी ओलांडला हजारांचा टप्पा, रुग्णसंख्या 1021 वर
- नागपूर - जेवणाच्या वादातून हमालाने झोपलेल्या मित्रांच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून एकाचा खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना लकडगंज परिसरात शनिवारी रात्री घडली. लालचंद मेंढे असे मृत हमालाचे नाव असून विनोद मोखे असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर कंडक्टर नावाचा हमाल गंभीर जखमी आहे.
सविस्तर वाचा - जेवणाच्या वादातून झोपलेल्या मित्रांवर हमालाचा हल्ला; डोक्यात हातोड्याचे घाव घालून केला खून
- नवी दिल्ली - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिगटाची महत्त्वपूर्ण बैठक आज बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा - राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिगटाची आर्थिक पॅकेजवर बैठक
- वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना कोरोना विषाणूमध्ये अमेरिका अधिकाऱ्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीबद्दल टीका केली होती. त्यावर आज राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामांवर पलटवार केला आहे. 'बराक ओबामा हे अत्यंत अयोग्य राष्ट्राध्यक्ष होते', असे ट्रम्प यांनी म्हटलं. कॅम्प डेव्हीड जाण्यापूर्वी व्हाईट हाऊसमधील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
सविस्तर वाचा - 'बराक ओबामा हे अयोग्य राष्ट्राध्यक्ष'