- मुंबई - फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा जीव मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाच्या सतर्कतेमुळे वाचला. धुळ्यातील ज्ञानेश पाटील हा तरूण फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तो व्हिडिओ फेसबुकच्या आयर्लंडमधील अधिकाऱ्यांनी पाहिला. त्यांनी तात्काळ मुंबई सायबर पोलिसांना याची माहिती दिली. यामुळे त्या तरूणाचा जीव वाचला.
सविस्तर वाचा - फेसबुक लाईव्ह करत चिरला स्वत:चा गळा; पुढे काय घडले वाचा एका क्लिकवर
- वर्धा - हिंगणघाटमधील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरो उभ्या ट्रकला धडकल्याने भीषण अपघात घडला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जण जखमी झाले आहे. हा अपघात सोमवारी रात्री घडला. हे सर्व नागपूरच्या उमरेडहून गणपतीपुळेला जात होते.
सविस्तर वाचा - देवदर्शनासाठी निघालेल्या युवकांच्या गाडीला अपघात, तिघे ठार चौघे जखमी
- मुंबई - औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेच्या भूमिकेला काँग्रेस, आरपीआयनंतर आता समाजवादी पक्षानेही विरोध केला आहे. औरंगाबादचे नाव बदलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम वाद लावू नये असे, आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे. नाव बदलायचे असल्यास रायगडाला संभाजी महाराजांचे नाव द्यावे व महाराष्ट्राचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र' करण्याची मागणी आझमी यांनी केली आहे.
सविस्तर वाचा - 'औरंगाबादचे नाव बदलून उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांप्रमाणे हिंदू-मुस्लिम वाद लावू नये'
- मुंबई - मागील 10 महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईची 'लाइफलाइन' म्हणजेच लोकल ट्रेन जानेवारीच्या 25 तारखेपासून पुन्हा सुरू होणार आहे. याबाबत राज्य सरकार व रेल्वेच्या सुत्रांनी माहिती दिली आहे. राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत घोषणा केली नाही. काही दिवसात अंतिम बैठक पार पडल्यानंतर ते जाहीर करणार आहेत.
सविस्तर वाचा - 25 जानेवारीपर्यंत लोकल नियमित? योग्य नियोजन करून रेल्वे होणार सुरू
- मुंबई- बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने आपल्या मैत्रिणीची हत्या करून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. मालाड पश्चिमच्या लिंक रोडवरील इनॉर्बिट मॉलच्या मागे ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
सविस्तर वाचा - धक्कादायक! मालाडमध्ये प्रियसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
- लंडन - नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. नवा विषाणू जास्त संसर्गजन्य असल्याने ब्रिटनमध्ये मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे.
सविस्तर वाचा - नव्या कोरोना विषाणूमुळे ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन
- मुंबई - पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात असताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत या सोमवारी अचानक ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाल्यानंतर त्यांची ईडी अधिकाऱ्यांनी 4 तास चौकशी केली. मात्र वर्षा राऊत ह्या माध्यमांना चकवा देत कार्यालयात आल्या व परतल्या. 5 जानेवारी रोजी ईडीकडून वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.
सविस्तर वाचा - वर्षा राऊत यांची ईडी चौकशी पूर्ण
- मुंबई - मुंबईसह राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेच्या हद्दीत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईमधील नाईट कर्फ्यू हटवण्यात यावा असा प्रस्ताव मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला असून आज मंगळवारी हा कर्फ्यू हटवण्याची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
सविस्तर वाचा - मुंबईतील नाईट कर्फ्यू आज हटवणार
- सांगली - जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडत असून या निवडणुकीच्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झालेले आहे. सोमवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल दोन हजार 42 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 3 हजार 76 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. तर जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
सविस्तर वाचा - सांगली : 3 हजार 76 उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रिंगणात
- मुंबई - कोरोना विषाणू विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोनावर लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही लस कांजूरमार्ग येथील लस साठवणूक केंद्रात आल्यावर ती सुरक्षित रहावी अथवा ती चोरीला जाऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी लसीचा साठा ठेवण्यात येणार आहे, त्याठिकाणी खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सविस्तर वाचा - मुंबईत लसीच्या कोल्ड स्टोरेजला पोलिसांचे संरक्षण
- जळगाव - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत सोमवारी (४ जानेवारी) अर्ज माघारीसाठी शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले. जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात अमळनेर तालुक्यातील सर्वाधिक १५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सविस्तर वाचा - जळगाव : ९२ ग्रामपंचायती बिनविरोध; ६९० ग्रामपंचायतींसाठी होणार निवडणूक