- मुंबई- नविन शेतकरी कायद्यावरून देशात आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा कायदा रद्द करा, यासाठी शेतकरी बांधव 27 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर बसले आहेत. या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील दिसू लागले आहेत. दरम्यान आज (मंगळवार) मुंबईत शेतकऱ्यांनी अदानी-अंबानीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.
अदानी-अंबानीच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचा बहिष्काराचा निर्धार
- मुंबई : अनलॉकमध्ये हॉटेल आणि बार सुरू करण्यात आले असले, तरी त्यांवर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. यामध्ये जाणाऱ्या लोकांना फिजिकल डिस्टन्सिंगसारख्या कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांना अनेक ठिकाणी धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील ड्रॅगनफ्लाय पबमध्येही असाच प्रकार समोर आला, ज्यानंतर पोलिसांनी पबवर धाड टाकत ३४ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मुंबईत सुरेश रैनासह ३४ जणांवर गुन्हा दाखल, मोठ्या सेलिब्रिटींचा समावेश
- नागपूर - कायद्याने कोणत्याच मंत्र्याला आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही, त्यामुळे जर बच्चू कडू हे आंदोलन करण्याचा पवित्रा घेत असतील तर सर्वात आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर आंदोलन करावं. मी जर मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडू यांचा राजीनामा घेतला असता, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. ते आज नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
'मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडू यांचा राजीनामा घेतला असता'
- सांगली - माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडकनाथ यात्रा काढण्याचे जाहीर केले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या किसान आत्मनिर्भर सभेच्या समारोपामध्ये कडकनाथ यात्रेचाही समारोप करण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी जाहीर केले आहे.
सदाभाऊंच्या किसान आत्मनिर्भर यात्रेविरोधात स्वाभिमानीची कडकनाथ यात्रा
- मुंबई - एअर इंटेलिजेन्स युनिटने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी महिला तस्कराला अंमली पदार्थासह अटक केली आहे. ती युगांडाची रहिवासी आहे. तिच्याकडून अडीच कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी महिला अंमली पदार्थ तस्कराला अटक
- जम्मू काश्मीर - अजाज हुसेन यांच्या विजयाने काश्मीर खोऱ्यात भाजपने आपले खाते उघडले आहे. आम्ही खोऱ्यातील इतर अनेक जागांवर आघाडी घेत आहोत. काश्मीर खोऱ्यातील लोकांना विकासाची इच्छा असल्याचे हा कौल दर्शवतो असे भाजप नेते शाहनवाज हुसेन म्हणाले.
जम्मू काश्मीर डीडीसी निवडणुकांचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात, पाहा LIVE अपडेट्स..
- मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून तपास केला जात आहे. टॉप्स ग्रुपच्या दोन अधिकाऱ्यांना ईडीने अटक केलेली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची सुद्धा ईडीकडून चौकशी करण्यात आली. प्रताप सरनाईक यांची मुले पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना पुन्हा ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. दोघेही 23 डिसेंबरला चौकशीसाठी उपस्थित होण्याची शक्यता आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पूर्वेश व विहंग सरनाईकांना पुन्हा ईडीचा समन्स
- नवी दिल्ली - भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कर्तृत्वाची जाण व्हावी, यासाठी राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी झाला होता.
भारतात का साजरा केला जातो राष्ट्रीय गणित दिवस?
- मुंबई - शाहरुख खानच्या २०१६ मध्ये रिलीज झालेल्या फॅन चित्रपटामध्ये भूमिका केलेल्या शिखा शर्माला या महिन्याच्या सुरूवातीला अर्धांगवायूचा झटका आला होता. ती उपचारांना प्रतिसाद देत असली तरी ती पुन्हा पुर्वत चालू फिरु शकणार आहे याबद्दलची स्पष्टता नाही.
'फॅन'मधील अभिनेत्री शीखा शर्माला अर्धांगवायूचा झटका, पुन्हा कधी चालू शकणार याबद्दल अस्पष्टता
- मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 'बॉर्डर-गावसकर' मालिकेचा दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. 'बॉक्सिंग डे' म्हणून ओळखला जाणारा हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. या सामन्याच्या सामनावीर पुरस्काराबात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) एक घोषणा केली आहे.
बॉक्सिंग डे कसोटी : सामनावीर खेळाडूला मिळणार 'जॉनी मुलघ' पदक