- पाटणा - मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि महाराष्ट्र सरकार विरोधात वाद सुरू आहे. कंगना रणौतने मुंबईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर हा वाद पेटला. आता बिहार राज्यातील मुजफ्फरपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते राजू नैयर यांनी सीजेएम न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वाचा - 'कंगना'प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् संजय राऊतांविरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल
- मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज राज्याने एकूण 10 लाख कोरोना रुग्णांचा आकडा ओलांडला आहे. आज दिवसभरात 24 हजार 886 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर, 393 रुग्णांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा - दिवसभरात कोरोनाची सर्वोच्च वाढ; राज्याने ओलांडला 10 लाखांचा आकडा
- मुंबई - मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे-जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशीदेखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार याप्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते, पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सविस्तर वाचा - मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही - मुख्यमंत्री
- मुंबई - कोरोनामुळे निधन झालेल्या सहकारी डॉक्टरला सरकारने विमा कवच नाकारले गेल्यामुळे डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. याभेटी दरम्यान डॉक्टरांच्या समस्या मांडण्यात आल्या. यावेळी सरकारविरोधात डॉक्टरांनी संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या समस्यासंदर्भात आरोग्यमंत्री आणि सरकारसोबत चर्चा करू, असे राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला सांगितले.
सविस्तर वाचा : विम्याच्या प्रश्नासंदर्भात खासगी डॉक्टरांनी घेतली राज ठाकरेंची भेट
- मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत हिच्या आई आशा रणौत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. म्हणूनच भाजपाचे लोक कंगनाला झाशीची राणी ही उपमा देतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीचे एकूणच कारस्थान भाजपाचेच आहे, हे स्पष्ट झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सावंत यांनी ट्विट करून कंगनाच्या आईने केलेल्या भाजपामधील प्रवेशाची माहिती देत तिला भाजपाकडून झाशीची राणी ही उपमा त्यासाठी दिली जात आहे. यामुळेच कंगनाच्या आडून महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान भाजपाचेच आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मुंबईला पाकिस्तान म्हणून भाजपाने महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा आणि त्यासोबतच 106 हुतात्म्यांचा घोर अपमान केला आहे, असा आरोपही सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
सविस्तर वाचा : 'महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान भाजपाचेच'
- मुंबई - कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने जनतेला अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे. खासगी लॅबशी संगनमत करून राज्याच्या आरोग्य खात्याने जनतेच्या खिशातून सुमारे २७० कोटी रुपयांची लूट केली आहे. याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
सविस्तर वाचा :सरकारच्या निष्क्रियतेमुळे खासगी लॅबधारकांनी जनतेची केली २७० कोटींची लूट - प्रविण दरेक
- चेन्नई - विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्यातील (फेमा) तरतुदींचे उल्लंघन करणे स्टँण्डर्ड चार्टड बँकेला महागात पडले आहे. फेमांतर्गत असलेल्या न्यायालयीन यंत्रणेने (ईडी) स्टँण्डर्ड चार्टड बँकेला १०० कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती सक्त अंमलबजावणी संचालनालयाने दिली आहे.
सविस्तर वाचा : १०० कोटींचा स्टँण्डर्ड चार्टड बँकेला दंड! 'फेमा'कायद्याचे उल्लंघन केल्याने ईडीची कारवाई
- मुंबई - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. पुढील रणनितीसंदर्भात उपलब्ध कायदेशीर पर्यायांवर राज्यसरकार पडताळणी करत असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, आरक्षणाच्या बाजूने लढलेले वकील मंडळी, अभ्यासक आणि जाणकारांशी चर्चा करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा : मराठा आरक्षण टिकवणारच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रण
- मुंबई - कोरोनामुळे 'जेईई मेन्स' ही सामाईक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी देशभरातून करण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारने अट्टहास करत या परीक्षेचे आयोजन केल्याने देशभरात तब्बल दोन लाख 20 हजार विद्यार्थी या परीक्षेला मुकले आहेत. यासंबंधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी ट्विट केले आहे.
सविस्तर वाचा : #JEE: 2 लाख 20 हजार विद्यार्थी जेईई परीक्षेला मुकले; नोंदणी नंतरही 95 हजार विद्यार्थी गैरहजर
- जळगाव - भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनावर लिहिलेल्या 'जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे' या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सोहळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नसल्याचा आरोप मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सविस्तर वाचा :एकनाथ खडसेंचे पुस्तक प्रकाशन वादात; सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने 'या' आमदाराकडून कारवाईची मागणी
- कोलकाता - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याप्रकरणी एका युवकाला पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातून अटक करण्यात आली आहे. हा युवक कंगना रणौतचा चाहता असल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील टोलेगुनगे भागातून त्याला अटक करण्यात आली.
सविस्तर वाचा : कंगनाच्या चाहत्याची संजय राऊत यांना धमकी; पश्चिम बंगालमधून अटक