ETV Bharat / bharat

Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या! - दुपारी चारच्या ठळक बातम्या

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news at four PM
Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : May 16, 2020, 4:15 PM IST

  • नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस लाख कोटींच्या पॅकेजवर टीका केली आहे. मजूरांना कर्ज नको, त्यांना पैसे द्या, अशी मागणी गांधी यांनी केलीय.

सविस्तर वाचा - मजूरांना कर्ज नको थेट पैसे द्या -राहुल गांधी यांची मागणी

  • मुंबई - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, देशातील सर्व राज्यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन केलं पाहिजे, असे मत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अनामिका रत्न यांना दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केले. सावंत यांनी ईटीव्ही भारतला दिलेली मुलाखत पाहा...

सविस्तर वाचा - Exclusive : देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित...

  • मुंबई - टोमॅटो पिकावर आलेल्या अज्ञात विषाणूचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत. बातमीची व तथ्यांची मोडतोड करून अफवा पसरवल्या जात आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा - 'टोमॅटोबाबत अफवा पसरवणे थांबवा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा'

  • मुंबई - बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावरील पहिले नॉन क्रिटिकल कोव्हिड रुग्णालय सोमवारपासून सुरू होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि टोपे यांनी काल (शुक्रवार) संध्याकाळी या रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी टोपे यांनी सोमवारपासून या रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू होतील असे सांगितले.

सविस्तर वाचा - बीकेसीतील कोव्हिड रुग्णालय सोमवारपासून सुरू, मंत्री टोपेंसह शरद पवारांनी केली पाहणी

  • मुंबई - कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शिक्षकांवर विविध प्रकारच्या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, यातून दिव्यांग, वयस्कर शिक्षक आणि स्तनदा माता यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - कोरोनासंबंधीच्या कामातून दिव्यांग आणि वयस्कर शिक्षकांना मुभा

  • सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी यायला सुरुवात झाली आहे. त्यांची कोरोनाची तपासणी करतेवेळी विलगीकरणाचा हातावर शिक्का मारून त्यांना शाळांमध्येच वेगळे ठेवले जाते. मात्र, विलगीकरणाचा शिक्का मारल्यानंतर त्या ठिकाणी हातावर जंतुसंसर्ग झाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे.

सविस्तर वाचा - अरे देवा..! चाकरमान्यांना गृह विलगीकरणाच्या शिक्क्याच्या शाईतून जंतुसंसर्ग

  • नवी दिल्ली - कोरोना महामारी आणि टाळेबंदी अशा दुहेरी संकटात अर्थव्यवस्था सापडली आहे. या संकटात विविध क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी घोषित करण्यात येणाऱ्या आर्थिक पॅकेजचा चौथा टप्पा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज जाहीर करणार आहेत.

सविस्तर वाचा - केंद्रीय अर्थमंत्री आर्थिक पॅकेजचा चौथा टप्पा आज जाहीर करणार

  • नवी दिल्ली - लॉकडाऊनचे भयाण वास्तव समोर येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये ट्रकचा मोठा अपघात झाला आहे. यामध्ये 24 जण ठार झाले आहेत. तर 35 जण जखमी असून त्यातील 20 जणांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - उत्तर प्रदेशात ट्रकचा भीषण अपघात; 24 स्थलांतरित मजूर ठार

  • नवी दिल्ली - कोरोनाचे संकट असताना देशातील विदेशी गुंतवणुकीबाबत दिलासादायक बातमी आहे. वोन वेल्क्स या पादत्राण कंपनीचे प्रमुख कॅसा एव्हरझ गम्ब यांनी चीनमधून उत्पादन प्रकल्प भारतात हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा - चीनमधून जर्मनीची 'ही' कंपनी भारतात हलविणार उत्पादन प्रकल्प

  • वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 3 लाख 8 हजार 645 कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत.

सविस्तर वाचा - Global Covid 19 Tracker: जगभरात 3 लाख 8 हजार कोरोनाबाधित दगावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.