- मुंबई- राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. पटोले यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. 7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनामध्ये त्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सविस्तर वाचा- विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना कोरोनाची लागण
- मुंबई - मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांकडून कंगना रणौतवर टीका केली जात आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांनीही कंगनावर टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणामध्ये आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. कंगनाला आरपीआय संरक्षण देईल, असे म्हणत त्यांनी कंगनाच्या पाठीशी आपण असल्याचे म्हटले आहे.
सविस्तर वाचा- रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकसह सॅम्युअल मिरांडाला एनसीबीकडून अटक
- मीरा भाईंदर(ठाणे) - अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तिला धमकी दिली आहे. कंगना मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत, असे सरनाईक म्हणाले आहेत. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वत: होऊन(सु-मोटो) दखल घेतली आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सविस्तर वाचा-प्रताप सरनाईक यांना तत्काळ अटक करा, कंगना रणौतवरील वक्तव्यानंतर महिला आयोगाची मागणी
- मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात सर्वाधिक 19 हजार 218 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 378 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा- राज्यात कोरोनावाढीचा नवा उच्चांक.. शुक्रवारी 19 हजार 218 नव्या रुग्णांची नोंद, 378 मृत्यू
- मुंबई- मुंबई पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थे संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या कंगना रनौत हिला मुंबईत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
सविस्तर वाचा- कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख
- मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने मुंबईला हॉटस्पॉट बनवले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या, शहरात स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांसह मुंबई महापालिकेच्या तब्बल २५८८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत चतुर्थ श्रेणीमधील १०७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मृत पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी पूर्ण केले नसल्याने कर्मचारी आणि कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सविस्तर वाचा- कोरोनामुळे महापालिकेच्या १३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, सर्वाधिक १०७ मृत्यू चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे
- मुंबई - नुकत्याच राज्यभरात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. काहींचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आलीय, तर काहींना बढती मिळाली. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्याला शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
सविस्तर वाचा-'मर्जीतले अधिकारी त्यांनी त्यांच्या काळात नेमले... आत्ताच्या नेमणुका कर्तबगारीनुसार'
- मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी केंद्रीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात आहे. आज सकाळी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरी एनसीबीने छापा टाकला. यावेळी एनसीबीच्या टीममध्ये काही महिला अधिकारीही होत्या. छापा टाकण्यात आल्यावर दोघांच्या घरांची झडाझडती घेण्यात आली. त्यानंतर मिरांडाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.
सविस्तर वाचा-'एनसीबी'ने सॅम्युअल मिरांडाला घेतले ताब्यात, एक तासांपासून चौकशी सुरू
- ठाणे - अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईला पाकव्याप्त म्हटल्याने शिवसेनेच्या महिला आघडीने ठाण्यात कंगनाच्या पोस्टरला काळ फासत जोडा मारो आंदोलन केले आहे. कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही यावेळेला शिवसेनेच्या महिला आघाडीने दिला आहे.
सविस्तर वाचा- कंगनाच्या पोस्टरला शिवसेना महिला आघाडीने फासले काळे; शिवसेना स्टाईलने स्वागत करण्याचा इशारा
- मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर टीका केली होती. त्यावर कंगनाने संजय राऊत आपल्याला उघडपणे मुंबईत येऊ न देण्याची धमकी देत आहेत, असा आरोप करत मुंबईची तुलना पीओकेशी (पाकव्याप्त काश्मीर) केली. त्यावरून तिच्यावर अनेकजण टीका करत आहेत. काँग्रेस, मनसे, भाजप आणि शिवसेनेकडून तिच्यावर टीका होत आहे.
सविस्तर वाचा- 'कंगना येथे आल्यावर तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही', शिवसेना आमदाराची धमकी
- नवी दिल्ली - गलवान संघर्षानंतर चीनने पुन्हा एकदा सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर नियंत्रण रेषेवरील वातावरण तापलेले आहे. लष्करासह निमलष्करी दलाचे जवानही सतर्क झाले आहेत. दरम्यान, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसचे प्रमुख एस. एस देसवाल यांनी सहा दिवसांचा लडाख दौरा केला. चिनी आक्रमणाला परतावून लावण्यासाठी आयटीबीपीच्या सज्जतेची पाहणी देसवाल यांच्याकडून करण्यात आली.
सविस्तर वाचा- भारत-चीन सीमेवरील तणाव वाढला.. आयटीबीपी प्रमुखांनी घेतला तयारीचा आढावा