- मुंबई - केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारने अनलॉक ४ ची घोषणा केली आहे. अनेक राज्यात रेल्वे, मेट्रो सेवा सुरू होत आहेत. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. आतापर्यंतच्या रुग्णवाढीमध्ये सर्वोच्च संख्या गाठत मागच्या २४ तासात राज्यात १७ हजार ४३३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
सविस्तर वाचा- राज्यात सर्वोच्च 17 हजार 433 कोरोनाबाधितांची वाढ; १३ हजार ९५९ रुग्णांना डिस्चार्ज
- नवी दिल्ली - सध्या भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनच्या 59 अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारताने कठोर पाऊल उचलत पुन्हा एकदा चीनच्या 118 अॅप बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, या अॅपमध्ये पबजी या गेमचाही समावेश आहे.
सविस्तर वाचा- भारताची चीनविरोधात दुसरी मोठी कारवाई... पबजीसह 118 मोबाईल अॅपवर बंदी
- जळगाव - मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणले होते. तेव्हा आता जे चमकत आहेत, ते नव्हते. गेल्या दहा-बारा वर्षात जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकत आहेत आणि तेच आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा कुणाचेही उघडपणे नाव न घेता स्वकियांवर टीकास्त्र डागले आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचे कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल, हे सांगता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सविस्तर वाचा- 10-12 वर्षात पुढं आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत, एकनाथ खडसेंचा स्वकीयांवर घणाघात
- पुणे - सीओईपी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेले जम्बो कोविड सेंटर सुसज्ज आणि सर्व सोयींनी युक्त असल्याचे सांगितले गेले होते. 800 बेडच्या या कोविड सेंटरमध्ये 600 ऑक्सिजन आणि 200 व्हेंटिलेटर असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर कोविड सेंटरचा फोल कारभार समोर आला आहे. रायकर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासन जागे झाले असून आता चक्क महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या वाहनातून व्हेंटिलेटर या सेंटरवर आणण्यात आले.
सविस्तर वाचा- 'पांडूरंग' गमावल्यानंतर जागं झालं प्रशासन.. जम्बो कोविड सेंटरमध्ये आणले व्हेंटिलेटर पण अतिक्रमणाच्या गाडीतून
- मुंबई- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे.
सविस्तर वाचा- आरेतील ६०० एकर जागा वनासाठी राखीव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा महत्वपूर्ण निर्णय
- नाशिक - पोलीस दलातील बदल्यांच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुबई येथे कायदा सुव्यवस्था विभागात सहआयुक्त पदी नियुक्ती झाली असून, नाशिकला पोलीस आयुक्त म्हणून दीपक पांडे यांची नियुक्ती झाली आहे. तर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची नियुक्ती झाली आहे. तर नाशिक पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची अमरावतीला पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.
सविस्तर वाचा - नाशिक पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे.. नांगरे-पाटलांची मुंबईत कायदा सुव्यवस्था विभागात बदली
- मुंबई- मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकार अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचा विकास व्हावा यासाठी उद्योग विभागाने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशातील सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाच्या वाढीसाठी, सुलभ वित्त पुरवठा व विकासासाठी काम करणाऱ्या भारतीय लघु उद्योग विकास बँक (सीडबी) या संस्थेसोबत राज्य शासनाने आज सामंजस्य करार केला आहे. सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाच्या वतीने उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व सीडबीच्या वतीने उपव्यवस्थापकीय संचालक व्ही.एस.व्ही राव यांनी स्वाक्षरी केली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी हे उपस्थित होते.
सविस्तर वाचा- सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या विकासासाठी राज्य सरकारचा सीडबी सोबत सामंजस्य करार
- नवी दिल्ली - सोशल मीडिया जायंट फेसबुक कंपनी भारतातील सत्ताधारी भाजप धार्जिणे धोरण स्वीकारत असल्यावरून मागील काही दिवसांपासून आरोप सुरू आहेत. विदेशातील वॉलस्ट्रिट जर्नल आणि टाईम्स मग्झिनमध्येही या संबंधीचे वृत्त आले होते. त्यानंतर भारतात काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजपला धारेवर धरले आहे. दरम्यान, भारतातील फेसबुकचे प्रमुख अजित मोहन आज(बुधवार) संसदीय समितीसमोर चौकशीसाठी हजर झाले होते.
सविस्तर वाचा- फेसबुक भाजप धार्जीणं, विरोधकांच्या टीकेनंतर भारतातील कंपनी प्रमुख संसदीय समितीपुढे हजर
- नाशिक - महाराष्ट्राचे माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा मृतदेह आज (बुधवार) सकाळी सापडला आहे. मंगळवारी इगतपूरी तालुक्यातील मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेलेले शेखर गवळी सेल्फी घेत असताना अचानक दरीत कोसळले होते. आज सकाळपासून शोध कार्याला सुरूवात करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या पथकाला तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांचा मृतदेह मिळाला. ही घटना काल (मंगळवार) संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अंधार असल्याने व दरीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने स्थानिक प्रशासनाने शोधकार्य थांबवले होते. त्यानंतर आज (बुधवार) सकाळी पुन्हा शोधकार्याला सुरुवात करण्यात आली होती.
सविस्तर वाचा- सेल्फी घेताना माजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा दरीत कोसळून मृत्यू
- मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला सध्या तरी राजकारणात प्रवेश करायचा नाही. आपल्याला अजून खूप पुढे जायचे आहे, असे तो म्हणाला. गेल्या काही दिवसापासून तो ज्या प्रकारे सामाजिक काम करतोय त्यातून तो राजकारणात उतरेल असी अटकळ काही जण बांधत होते. त्याला सोनूने पूर्ण विराम दिला आहे.
सविस्तर वाचा- गेल्या १० वर्षापासून पक्षात येण्याची ऑफर - सोनू सूद