ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या! - महत्त्वाच्या घडामोडी

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 11 PM
रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Sep 6, 2020, 7:31 AM IST

Updated : Sep 6, 2020, 10:48 PM IST

  • नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसात नोंदवली गेलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. या पार्श्वभूमीवर संसदेच्या आरोग्य विषयक स्थायी समितीची उद्या(सोमवार) बैठक आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाचा प्रसार थांबेना...! संसदीय स्थायी समितीची सोमवारी बैठक

  • सातारा- तरुणाकडून २५ हजार रुपयांची खडणी उकळल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी वनविभागातील परळीचे वनपाल योगेश गावित व वनरक्षक महेश सोनावलेसह अन्य दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा - सातारा: वनपालावर खंडणीचा गुन्हा, युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली होती धमकी

  • पुणे - शहरात पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे, अशी जी अफवा पसरवली जात आहे त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शहरात कुठेही लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

सविस्तर वाचा - पुणे शहरात कुठेही लॉकडाऊन नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - महापौर

  • लातूर- राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेली प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात जेईईच्या परीक्षेचा आज शेवटचा दिवस होता. शिक्षणाचा लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर शहरातील २ परीक्षा केंद्रावर आज आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग या २ विषयाची परीक्षा पार पडली.

सविस्तर वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी-नियमांसह लातुरात पार पडली जेईई परीक्षा

  • ठाणे - महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल रुग्णालयातील एका ७२ वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.

सविस्तर वाचा - ठाण्यात वृद्ध कोरोनाबाधिताची आत्महत्या, रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

  • नाशिक- येवला तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यात मका व बाजरीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सविस्तर वाचा - येवला तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, मका व बाजरी पिकांचे नुकसान

  • नवी दिल्ली - मागील चार महिन्यांपासून भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढला आहे. पूर्व लडाखमधील अनेक भागांत चीनकडून घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत लष्कराची सज्जता अंत्यत महत्त्वाची आहे. सीमेवर तणाव असतानाच लष्कराने सीमा भागातील रस्ते बांधकामाला वेग दिला आहे.

सविस्तर वाचा - भारत-चीन तणाव: सीमा भागातील रस्त्यांचे काम युद्ध पातळीवर सुरू, चीनला रोखण्यास लष्कर सज्ज

  • मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जबाबत तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) आज (रविवारी) सकाळी सुशांतची प्रेमिका रिया चक्रवर्ती हिला समन्स बजावले होते. त्यानुसार चौकशीसाठी रिया चक्रवर्ती आज एनसीबी कार्यालयात हजर झाली होती.

सविस्तर वाचा - सुशांतसिंह प्रकरण : रिया चक्रवर्तीला अटक नाही; एनसीबी उद्या पुन्हा करणार चौकशी

  • लखनऊ - काँग्रेसमध्ये आणखी एक 'लेटर बॉम्ब' येऊन पडला आहे. हे पत्र उत्तर प्रदेशातून आले आहे. मागील वर्षी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या नऊ वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना एक पत्र पाठवले आहे. यामध्ये पक्ष केवळ 'इतिहास'चा भाग बनून राहण्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असे यात सुचवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - काँग्रेसमध्ये आणखी एक 'लेटर बॉम्ब', सोनिया गांधींना कुटूंबाच्या मोहातून बाहेर येण्याचा सल्ला

  • ठाणे - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ठाकरे सरकार दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अभिनेत्री कंगना रणौतचे 'ते' बोलणे चुकीचे आहे, असे मत भाजपा नेते किरीट सोमैया यांनी व्यक्त करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

सविस्तर वाचा - 'कंगना चुकली; मात्र, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण ठाकरे सरकार दडपण्याच्या प्रयत्नात'

Last Updated : Sep 6, 2020, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.