मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना प्रश्नी सविस्तर सादरीकरण झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळाला. मागील २४ तासात राज्यात १८ हजार ३९० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
सविस्तर वाचा - 'कोरोना उद्रेकाला सलग दुसऱ्या दिवशी दिलासा, आज राज्यात १८ हजार ३९० नव्या रुग्णांची नोंद'
पुणे - राज्यासह पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब ही औषधे उपलब्ध होत नसल्याच्या, तसेच औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिले असून, दोन्ही औषधांचा साठा मर्यादित असला, तरी तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
सविस्तर वाचा - रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधींचा साठा पुरेसा, वितरकांची यादी जाहीर
जळगाव - गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारात असलेल्या अस्थिरतेचा परिणाम अजूनही कायम आहे. मंगळवारी (२२ सप्टेंबर) एकाच दिवसात चांदीच्या भावात सहा हजार रुपये, तर सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदी ६८ हजार रुपयांवरून थेट ६२ हजार रुपये प्रतिकिलोवर (जीएसटीसह) तर सोने ५१ हजार ९०० रुपयांवरून ५१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर (जीएसटीसह) आले.
सविस्तर वाचा - चांदीसह सोन्याच्या भावातही घसरण, बाजारातील अस्थिरतेचा परिणाम
मुंबई - मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, अशी माहिती मंत्री अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वाचा - मराठा समाजाला दिलासा.. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
नागपूर - राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद मी ऐकली आहे. त्यात त्यांनी शेती विषयक विधेयकाला कुठेही विरोध केला नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पवारांनी संसदेत जे घडले आहे, त्यात दोषी असलेल्या खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्या कारवाईच्या निमित्ताने त्यांनी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे फडणवीस म्हणाले. एवढंच नाही तर संसद सदस्यांनी अशोभनीय कृती केली नसती तर शरद पवारांना एक दिवसाचा उपवास करावा लागला नसता, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे.
सविस्तर वाचा - 'पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाही, संसदेत घडलेल्या प्रकाराच्या माध्यमातून विरोधकांना पाठिंबा'
मुंबई - कंगना रणौतच्या मालमत्तेवरील कारवाईसंदर्भात महापालिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आजची सुनावणी उद्यावर टळली आहे. कंगनाने संजय राऊत आणि भाग्यवंत लोटे ह्यांना प्रतिवादी करण्याची विनंती हायकोर्टाकडे केली होती. त्यासंदर्भात आता उद्या कोर्टात उत्तर देण्यात येईल.
सविस्तर वाचा - महानगरपालिकेच्या प्रतिज्ञापत्रावर कंगनाचे हायकोर्टात उत्तर दाखल, आजची सुनावणी उद्यावर
मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात आज रिया व शोविक यांच्यासह सहा आरोपींचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी आता मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे, या अर्जावर उद्या (23 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.
सविस्तर वाचा - रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयीन कोठडीत वाढ
नाशिक - मराठा आरक्षण टिकवण्यासाठी महाविकास आघाडी गंभीर आहे. मागच्या सरकारने दिलेले वकील व आम्ही दिलेले नवीन वकील एकत्रितपणे न्यायालयात मराठा आरक्षणाची लढाई लढत आहेत. मराठा आरक्षणाबाबत राजकीय स्वार्थासाठी कोणी कोल्हेकुई करू नये, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना लगावला आहे.
सविस्तर वाचा - मराठा आरक्षणावर राजकीय स्वार्थासाठी 'कोल्हेकुई' करू नये; जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला
मुंबई : राज्यसभेत ज्याप्रकारे कृषी विधेयके मंजूर करण्यात आली, तो प्रकार दुर्दैवी होता. याचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादीचे सदस्य आज दिवसभर अन्नत्याग करणार असून, आपणही त्यात सहभागी होणार असल्याचे शरद पवारांनी आज सांगितले. ते मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
सविस्तर वाचा - 'उपसभापतींचे चुकलेच', शरद पवारांचे मत; निलंबित खासदारांच्या समर्थनार्थ करणार लाक्षणिक अन्नत्याग
नवी दिल्ली - खासगी कंपनीत काम करणारे बरेच कामगार इपीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी)साठी कोर्टात खेटे घालत आहेत. पेन्शनसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांना पेन्शन मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आज आपण कामगारांसाठी चांगला विधेयक आणला आहे आणि त्याची गरज असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.
सविस्तर वाचा -'सरकारकडे इपीएफ पेन्शनर्सचे ५ लाख कोटी, तरीही तुटपुंजी पेन्शन का देता?'