- मुंबई - येथील आर्थर रोड कारागृहात 77 कैदी व 26 कारागृह कर्मचारी कोरोनाग्रस्त आढल्यानंतर या सर्वांना उपचारासाठी कारागृहाबाहेर हलविण्यात होते. आता मुंबईतील भायखळा येथील महिला कारागृहात एका 54 वर्षीय महिला कैदीचासुद्धा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आढळल्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वाचा - भायखळा महिला कारागृहातही कोरोनाचा शिरकाव, एक महिला कैदी बाधित
- रायगड - उरण तालुक्यात एकाच कुटुंबातील 21 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 234 वर पोहचली आहे. करंजा गावातील हे कुटुंब आहे. या 21 पैकी 15 जणांना नवी मुंबईच्या एमजीएम कामोठे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - चिंताजनक..! उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जणांना कोरोनाची लागण
- मुंबई- विधान परिषदेच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद दिसून येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीकडून ५ जागा निश्चित होत असताना बिनविरोध निवडणुकीची शक्यता होती. मात्र, काँग्रेसने सहाव्या जागेवरही उमेदवार दिल्याने शिवसेनेत नाराजीचे वातावरण आहे.
सविस्तर वाचा - विधान परिषद निवडणूक : सहाव्या जागेवरून महाविकासआघाडीत मतभेद, मुख्यमंत्री ठाकरे संतप्त
- रायगड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठीण परिस्थितीत गेल्या दीड महिन्यापासून कोविड-19 च्या आयसोलेशन कक्षात उर्मिला पाटील या रुग्ण सेवेचे कर्तव्य बजावत आहेत. तर दुसरीकडे एक आई म्हणूनही आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. अशा या कोरोना योद्धा असलेल्या उर्मिला पाटील यांच्या कार्याचा मातृदिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला विशेष आढावा...
सविस्तर वाचा - मदर्स डे विशेष: कोरोना योद्धा आणि आई.. दीड महिन्यापासून आयसोलेशन कक्षात सेवा
- अमरावती - महसूल उत्पादन वाढवण्याच्या हेतूने शासनाने सुरू केलेल्या दारू विक्रीचे परिणाम अमरावती जिल्ह्यात दिसून आले. चक्क पोलीस पाटलानेच दारूच्या नशेत विलगीकरण कक्षात असलेल्या एका मजूर महिलेला शरीरसुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदी येथे घडला आहे.
सविस्तर वाचा - विलगीकरण कक्षात असलेल्या महिलेला पोलीस पाटलाने केली शरीरसुखाची मागणी
- मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतात केलेल्या लॉकडाऊनमुळे ब्रिटनमध्ये अडकलेले एकूण 329 भारतीय नागरिक आज एअर इंडियाच्या विमानाने भारतात परतले. शनिवारी रात्री लंडनहून निघालेले विशेष विमान रविवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.
सविस्तर वाचा - मिशन वंदे भारत : लंडनमध्ये अडकलेले 329 भारतीय मायदेशी परतले
- नवी दिल्ली - एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. मालवाहतूक विमान चीनला घेवून गेले असता कोरोनाची लागण झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या सर्व वैमानिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत.
सविस्तर वाचा - एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण; चीनला जाऊन आल्यानंतर बाधित
- श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सांबामध्ये 3 ग्रेनेड आणि 54 काडतुसे सुरक्षादलाने जप्त केली आहेत. त्यानंतर संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
सविस्तर वाचा - जम्मू काश्मीरमध्ये ३ हँड ग्रेनेड आणि 54 काडतुसे जप्त, सुरक्षा दलाची कारवाई
- नवी दिल्ली - सिक्कीमच्या नाकू-ला प्रांतामध्ये असलेल्या भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये आज बाचाबाची झाली. या पार्श्वभूमीवर सीमा भागामध्ये तणाव निर्माण झाला आहे.
सविस्तर वाचा - भारत-चीनच्या जवानांमध्ये बाचाबाची; सिक्कीमच्या सीमेवर तणाव..
- तिरुवअनंतपूरम - मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन नौदलाचे INS जलाश्व जहाज कोची बंदरात दाखल झाले आहे. ६९८ भारतीयांना घेऊन जहाज माघारी आले आहे. नौदलाने याबाबत माहिती दिली आहे. या प्रवासांमध्ये १९ गर्भवती महिला आहेत.
सविस्तर वाचा - मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन INS जलाश्व कोची बंदरात दाखल