नवी दिल्ली - केंद्र सरकारने नुकतेच तीन कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्यास शिरोमणी अकाली दल या भाजपच्या सहकारी पक्षाने विरोध केला होता. पक्षाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांनी मदभेदानंतर राजीनामा दिला आहे. मात्र, आता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच (एनडीए) बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी - कृषी विधेयकावरील मतभेदानंतर शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर
मुंबई - गेल्या २४ तासात राज्यात नवीन २० हजार ४१९ कोरोनाबाधित आढळले आहेत. यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख २१ हजार १७६ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे २३ हजार ६४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, ४३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी - राज्यात आज २३ हजार ६४४ रुग्ण कोरोनामुक्त.. २० हजार ४१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) संयुक्त राष्ट्राच्या ७५व्या महासभेच्या सत्राला संबोधित केले. यावेळी संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून त्यांनी भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याच्या मागणीचा पाठपुरावा केला. गेल्या अनेक वर्षांपासून भारत ही मागणी करत आला आहे. 'संयुक्त राष्ट्राच्या निर्णय घेणाऱ्या गटापासून भारताला किती दिवस दूर ठेवणार', असा सवाल त्यांनी जगाला केला.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी - 'संयुक्त राष्ट्राच्या निर्णय घेणाऱ्या गटापासून भारताला किती दिवस दूर ठेवणार?'
मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची आज सांताक्रूझ येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. या भेटीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नसल्याचे म्हटले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी - 'या' साठी संजय राऊतांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; प्रविण दरेकरांचा खुलासा
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने बिहार निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय पक्षनेतृत्वात मोठा बदल केला आहे. राम माधव, अनिल जैन, सरोज पांडे आणि पी. मुरलीधर राव यांसारख्या नेत्यांनी नावे नव्या पक्ष नेतृत्त्वाच्या यादीतून गायब आहेत. त्यामुळे आता कॅबिनेटमध्येही बदल करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या नेत्यांना आता कॅबिनेटमध्ये जागा मिळते की नाही, ते पाहणे महत्वाचे ठरेल.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी - भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्त्वातून वगळलेल्या नेत्यांची कॅबिनेटमध्ये लागणार वर्णी?
कोल्हापूर/नाशिक - इकडची काडी, तिकडची चाडी करू नका. कोल्हापूर व साताऱ्याची गादी एकच असून दोन्ही छत्रपती एकच आहेत. त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका. फालतुगिरी केल्यास ठोकून काढू, असा सज्जड इशारा खासदार संभाजी छत्रपती यांनी दिला. ते नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी - 'कोल्हापूर अन् साताऱ्याची गादी एकच, फालतूगिरी केल्यास ठोकून काढू'
मुंबई - कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही विधेयके मंजूर करुन घेतली आहेत. केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मुल्ये व संसदीय नियम पायदळी तुडवत असून हे अत्यंत निषेधार्ह आहे. सरकारने हे काळे कायदे मागे घ्यावेत यासाठी देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. काँग्रेस पक्ष या शेतक-यांसोबत असून कायदे मागे घेईपर्यंत संघर्ष करत राहील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी - 'शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार'
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधनसह सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. दरम्यान, भाजपने राष्ट्रीय नेतृत्वात मोठा बदल केला आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पूर्वसुरी अमित शाह यांनी निवडलेल्या नेत्यांना नारळ दिला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी - बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून केंद्रीय पक्ष नेतृत्त्वात मोठा बदल
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीची घोषणा केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी भारतीय फिरकीपटू नीतू डेव्हिडला स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयने शनिवारी ही घोषणा केली. नीतू यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती आता महिला क्रिकेट संघ निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करेल, असे बीसीसीआयने सांगितले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी - महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी नीतू डेव्हिड, बीसीसीआयची घोषणा
नवी मुंबई - नवी मुंबई शहरातील वाढते कोरोनाचे संक्रमण पाहता आय.सी.एम.आर. व महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार काही खाजगी दवाखान्यांना उपचाराखातर नवी मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली होती. असे असताना नवी मुंबईत काही खाजगी दवाखान्यांनी विनापरवानगी कोविड रुग्णांवर उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडला होता. याबाबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे तक्रारी येतात त्यांनी कारवाईचा बडगा उगारला असून दोन दिवसापूर्वी वाशीतील पाम बिच रुग्णालय व कारवाई केल्यानंतर आता ग्लोबल फाईव्ह केअर रुग्णालय वाशी व क्रीटी केयर रुग्णालय ऐरोली या आणखी दोन रुग्णालयांवर कारवाई केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी - कोविड रुग्णांवर विनापरवाना उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर महापालिकेची कारवाई