ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या! - सायंकाळी सातपर्यंतच्या ठळक बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 11 PM
रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Sep 20, 2020, 3:19 PM IST

Updated : Sep 20, 2020, 10:46 PM IST

  • मुंबई - राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात आज पुन्हा दिवसाच्या रुग्णवाढीमध्ये २४ तासांत २० हजार ५९८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ८ हजार ६४२ झाली आहे. राज्यात २ लाख ९१ हजार २३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ४५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३२ हजार ६७१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा- राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला : आज २० हजार ५९८ नव्या रुग्णांची नोंद

  • मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात आलेल्या विविध धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

सविस्तर वाचा- मुंबईत 5038 रुग्णांची कोरोनावर मात, दिवसभरात नवे 2236 रुग्ण, 44 मृत्यू

  • नवी दिल्ली - 'जेव्हा देशात कोरोना पसरत होता तेव्हा तुम्ही राज्यातील सरकारे पाडण्यात व्यस्त होता', अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.

सविस्तर वाचा- 'जेव्हा देशात कोरोना पसरत होता तेव्हा तुम्ही राज्यातील सरकारे पाडण्यात व्यस्त होता'

  • दुबई - दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोन संघ आयपीएलच्या १३व्या हंगामाच्या दुसऱ्या सामन्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दुबईच्या इंटरनॅशल क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळला जात आहे. दोन युवा कर्णधार, विजयी श्रीगणेशा करण्यासाठी मैदानात उतरतील. श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे, तर केएल राहुलकडे किंग्जची धुरा आहे.

सविस्तर वाचा- DCvsKXIP LIVE : १० षटकांनंतर ५५ धावांत पंजाबचा निम्मा संघ तंबूत

  • नाशिक- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे काम लवकरच सुरू करून डिसेंबर महिन्यापर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या जानेवारी पासून हे उपकेंद्र विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येणार असून, या केंद्रात उद्योग आधारित नाविन्यपूर्ण आभ्याक्रमांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

सविस्तर वाचा- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे काम लवकरच होईल पूर्ण - उदय सामंत

  • पुणे - 'त्या' अभिनेत्रीच नाव घेण्याचं काही प्रश्न नाही. 'ती' अभिनेत्री नाव घेण्याच्या लायकीची नाही. त्यामुळे 'त्या' अभिनेत्रीच नाव न घेता मी इतकेच सांगेन की, ज्या पद्धतीने मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचे काम, महाराष्ट्राला पाकिस्तान म्हणण्याचा काम, मुंबई पोलिसांना माफिया म्हणण्याचा काम ज्या व्यक्तीने केले आहे, अशा व्यक्तीला जेव्हा एखादा राजकीय पक्ष खतपाणी घालण्याचे काम करत आहे, याचाही विचार समाजाने करायला हवा, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनेत्री कंगना रणौत हिचे नाव न घेता व्यक्त केले. ते येथे आयोजित 'गौरव खाकी वर्दीचा' या कार्यक्रमात बोलत होते.

सविस्तर वाचा- 'ती' अभिनेत्री नाव घेण्याच्याही लायकीची नाही'

  • नवी दिल्ली - सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात खासदार डीएमके पक्षाचे नेते दयानिधी मारन यांनी देशातील सद्यस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच 'आताच्या कॅबिनेटमधील एकाही मंत्र्यामध्ये 'मोदी तुम्ही चुकताय,' असं सांगण्याची हिंमत नाही, असे ते म्हणाले. मोदीच्या रात्री 8 वाजता येऊन घोषणा करण्याच्या सवयीने लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच, मोदींनी अचानक लॉकडाऊन लागू केले.

सविस्तर वाचा- 'सरकारच्या एकाही मंत्र्यांमध्ये 'मोदी तुम्ही चुकताय,' असं सांगण्याची हिंमत नाही!'

  • नवी दिल्ली - संसदेत पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. यावेळी संसदेमध्ये कोरोना, अर्थव्यवस्था, अचानक लागू करण्यात आलेले लॉकडाऊन तसेच मोदींनी देशातील जनतेला दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनावरुन काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. 'हम यह नही कहते महामारी नही थी, हम यह बता रहे है तयारी नही थी, तयारी से लढते तो हालात ना होते, रेल की पटरी पर वो प्रवासी ना सोते', या कवितेद्वारे त्यांनी लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी सामना केलेल्या संकटाचा उल्लेख करत, मोदींवर निशाणा साधला.

सविस्तर वाचा- 'हम यह नही कहते महामारी नही थी, हम यह बता रहे है तैयारी नही थी', थरूर यांची कवितेद्वारे मोदींवर टीका

  • ठाणे- गणेशोत्सव आणि दहीहंडी हे दोन्ही उत्सव कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यामुळे, यंदा मोठ्या प्रमाणात हंडी आणि गणेश मूर्त्या कुंभारांच्या दुकानात जशाच्या तशाच पडून राहिल्या. यामुळे कुंभार समाजाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता काही दिवसांवरच नवरात्री आहे. त्यावर कुंभार समाजाची आशा आहे. यातून उदरनिर्वाहाचा खर्च मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

सविस्तर वाचा- कोरोना काळात देवीच्या मूर्तीसह गरबा मटक्यांची मागणी घटली, कुंभारांकडून मदतीचे आवाहन

  • नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे. आज शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके पारित झाली आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही विधेयके मांडली होती. यादरम्यान, विधेयकांविरोधात विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

सविस्तर वाचा- राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ व घोषणाबाजीत कृषीविषयक विधेयके मंजूर

Last Updated : Sep 20, 2020, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.