- नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करोनाची लागण झाली आहे. गडकरींनी स्वत: ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नितीन गडकरी यांनी स्वत:ला विलगीकरण केले असून आपली प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यासोबतच आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
सविस्तर वाचा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण
- मुंबई - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाची दुसरी लाट नसल्याचे सांगितले असले, तरी देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात राज्यात २३ हजार ३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
सविस्तर वाचा- राज्यात कोरोनाचा उद्रेक, आज २३ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद
- मुंबई - शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी नवीन साडेबारा हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख दिली. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे.
सविस्तर वाचा- खूशखबर; राज्यात नवीन साडेबारा हजार पोलिसांची 'जम्बो भरती'
- मुंबई - अनुदानाच्या मागणीसाठी मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या आकाशवाणी आमदार निवासाच्या चौध्या मजल्याबर जाऊन चक्क शोले स्टाईल आंदोलन करणार्या शिक्षकाला आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लेखी आश्वासन दिले. त्यामुळे या शिक्षकाने हे आंदोलन मागे घेतले. गजानन खैरे असे या शिक्षकाचे नाव आहे. तो जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. अनुदानाचा प्रश्न सरकारकडून सोडवला जात नाही, या मागणीसाठी त्यांनी हे आकाशवाणीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले.
सविस्तर वाचा- विधानसभा अध्यक्षांच्या लेखी आश्वासनानंतर 'त्या' शिक्षकाचे 'शोले स्टाईल' आंदोलन मागे
- नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) ठेवीदारांचा प्रश्न उपस्थित केला. ठेवीदारांना पैसे परत मिळ्ण्याची नेमकी मुदत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगावी, अशा खासदार सुळे यांनी यावेळी मागणी केली.
सविस्तर वाचा- पीएमसीच्या ठेवीदारांना पैसे परत मिळण्याची मुदत सांगा-सुप्रिया सुळे
- मुंबई - शहरातील मालवणी परिसरामध्ये एका तीन वर्षीय मुलाच्या अंगावरून कार गेल्याची घटना घडली आहे. अंगावर शहारे आणणारी व काळजाचा ठोका चुकविणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून याचे सीसीटीव्ही फूटेज आज समोर आले आहेत.
सविस्तर वाचा- VIDEO : तीन वर्षीय चिमुकला आला गाडीखाली, अन्...
- मुंबई - राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज कोविड नियंत्रणासंदर्भात सादरीकरण झाले. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये सहा ठिकाणी टेलिमेडिसीन सुरू करण्यात येणार आहे. लवकरच टेलिमेडिसीन योजना ३६ जिल्ह्यांमध्ये लागू केली जाईल. राज्यात कोरोनाची दुसरी लाट नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सविस्तर वाचा- राज्यात कोरोनाची दुसरी लाट नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण
- नवी दिल्ली - मेरठमधील सैदपूर गावातील शेतकरी पदयात्रा करत गाझियाबादमधील गोविंदपूरम येथे पोहोचले आहेत. सर्व शेतकरी शहरातील धान्य बाजारजवळ एकत्र झाले असून त्यांना भारतीय किसान यूनियन (बलराज)चेही सहकार्य मिळाले आहे. एन-एच 9 दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वे तयार करताना, सरकारने मेरठ आणि गाझियाबादमधील 25 गावातील जमिनीचे अधिग्रहण केले होते. मात्र, सरकारने नुकसानभरपाईची रक्कम वेगवेगळी दिली आहे. सर्व शेतकऱ्यांना एकसमान रक्कम मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
सविस्तर वाचा- गाझियाबाद : जमीन अधिग्रहणाची रक्कम एकसमान मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे अंदोलन
- वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकन लोकांना कोरोनाची लस विनामूल्य उपलब्ध करुन देण्यासाठी ट्रम्प सरकारने बुधवारी एका व्यापक योजनेची रूपरेषा आखली आहे. फेडरल हेल्थ एजन्सीज आणि संरक्षण विभागाने जानेवारीत किंवा शक्यतो या वर्षाच्या उत्तरार्धात लसीकरण मोहिमेसाठी योजना आखल्याची माहिती आहे.
सविस्तर वाचा- नागरिकांना देणार मोफत कोरोना लस ; अमेरिकन सरकारने आखली योजना
- मुंबई - यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा 'अधिक खास' ठरेल, असे भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. यासाठी सेहवागने एक कारण दिले आहे. क्रिकेटपासून दूर असलेला भारताचा महान माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला या स्पर्धेत पाहता येणार असल्यामुळे सेहवाने या आयपीएलला अधिक खास म्हटले आह
सविस्तर वाचा- 'या' कारणासाठी सेहवागला वाटते यंदाची आयपीएल अधिक खास