ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..., वाचा एका क्लिकवर - top 10 news events around the globe

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top-10-news-events-around-the-globe
Top 10 @ 9 PM : रात्री नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..., वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Sep 14, 2020, 7:05 AM IST

Updated : Sep 14, 2020, 10:56 PM IST

  • मुंबई - कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा येथून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

सविस्तर वाचा- 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' मोहीम परिणामकारकपणे राबवा

  • मुंबई- राज्यात आज कोरोना १७ हजार ६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्यात ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २ लाख ९१ हजार २५६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आज १५ हजार ७८९ रुग्ण बरे झाले.

सविस्तर वाचा- राज्यात सोमवारी १७ हजार ६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

  • मुंबई- देशात आणि राज्यात कोरोनाविरोधी लढत असताना केला काही दिवसात ऑक्सिजन तुटवड्यामुळे जनतेमध्ये उद्रेक निर्माण झाला होता. शासनाने आज दिलासादायक निर्णय घेऊन ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतुकीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची अधिसूचना आज मंत्रालयातून काढण्यात आली.

सविस्तर वाचा- ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

  • मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे खासगी डॉक्टरांच्या समस्या मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. खासगी सेवेतील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा विम्याचे कवच सरकार का नाकारत आहे? असा सवाल राज ठाकरेंनी या पत्रातून उपस्थित केला आहे.

सविस्तर वाचा- सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  • औरंगाबाद- मराठा समाजाला पुढच्या ८ दिवसात न्याय द्या, अन्यथा मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारला दिला. औरंगाबादमध्ये मराठा समाजाची एक बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षण संदर्भात पुढील वाटचालीबाबत विचारविनिमय करण्यात आला.

सविस्तर वाचा- मराठा समाजाला आठ दिवसात न्याय द्या; अन्यथा.., मराठा आरक्षण याचिकाकर्त्याचा इशारा

  • ठाणे - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणला दुर्दैवाने स्थगिती मिळाली. मात्र, मराठा आरक्षण टिकले पाहिजे. ते टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेत असल्याची माहिती नगरविकासमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शिंदे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेने नव्याने उभारलेल्या कोविड रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी कल्याणात आले होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर आपले मत मांडले.

सविस्तर वाचा- 'मराठा आरक्षण टिकवणे, ही सरकारची जबाबदारी; त्यासाठी सरकार प्रयत्न करतेय'

  • औरंगाबाद - येथील दैनिक सामनाचे पत्रकार राहुल स्वामीदास डोल्हारे (वय - 49, रा. संघर्षनगर) यांचा सोमवारी कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्यावर मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वाचा- राज्यात आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू

  • लातूर - मराठा आरक्षणाला स्थगिती हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यात सरकार कमी पडले. शिवाय यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली, असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी केला आहे. चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज (सोमवारी) मेटे यांनी त्याची भेट घेतली. यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सविस्तर वाचा- 'मराठा आरक्षणाला स्थगिती हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप'

  • वॉशिंग्टन : चीनच्या विषाणूशास्त्रज्ञ ली-मेंग यॅन यंनी कोरोना विषाणूच्या उगमाबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानंतर त्यांना चीनमधून निघून जाण्यास सांगण्यास आले होते. कोरोना विषाणू हा चीनमधील प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आल्याचे यॅन यांचे मत होते. अमेरिकेतील एका मुलाखतीमध्ये यॅन यांनी आता पुन्हा एकदा हा दावा केला आहे.

सविस्तर वाचा- कोरोना हा प्रयोगशाळेतच तयार झाला! चीनच्या विषाणूशास्त्रज्ञाचा पुनरुच्चार

  • नवी दिल्ली - बर्‍याच चढ-उतारानंतर इंडियन प्रीमियर लीगचा नवा हंगाम यूएईमध्ये सुरू होणार आहे. आयपीएलमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना चाहत्यांची अनुपस्थिती जाणवेल, तर दिग्गज खेळाडूंची उपस्थिती या स्पर्धेची शान वाढवेल. जवळपास प्रत्येक संघात असे खेळाडू असतात, ज्यांना खेळताना पाहण्यासाठी चाहते आयपीएलसाठी आतुरलेले असतात. यावर्षी आयपीएलच्या आयोजनाच्या पद्धतीत बदल झाला असला, तरी या खेळाडूंमुळे आयपीएलच्या प्रसिद्धीत घट झालेली नाही.

सविस्तर वाचा- 'या' दिग्गज क्रिकेटपटूंची २०२० ची आयपीएल असणार अखेरची?

Last Updated : Sep 14, 2020, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.