- मुंबई - राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाईल, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. यामुळे राज्यात या महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या हालचालींना पूर्णविराम लागला आहे.
सविस्तर वाचा - राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण
- मुंबई - राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 485 पोलीस कोरोनाबाधित झाले असून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे कर्तव्य बजावताना आतापर्यंत राज्यात 186 पोलिसांचा मृत्यू झाला असून यामध्ये 16 पोलीस अधिकारी तसेच 170 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सविस्तर वाचा- राज्यात गेल्या 24 तासात 485 पोलीस कोरोनाबाधित..
- मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. शनिवारी (दि. 12 सप्टें.) मुंबईत 2 हजार 321 नव्या कोरोनाग्रस्तांचनी नोंद झाली असून 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा- मुंबईत कोरोनाच्या नव्या 2 हजार 321 रुग्णांची नोंद, 42 रुग्णांचा मृत्यू
- मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात २२ हजार ८४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १० लाख १५ हजार ६८१ झाली आहे. राज्यात शनिवारी ३९१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा- राज्यात दिवसभरात कोरोनाचे २२ हजार ८४ नवे रुग्ण; ३९१ मृत्यू
- रांची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला झारखंड पोलिसांनी अटक केली आहे. कृष्ण कुमार सिंह उर्फ सिद्धनाथ सिंह असे या चलाख आरोपीचे नाव आहे. त्याने फोनवरून उद्धव ठाकरे यांना धमकी दिली होती. दिल्ली गुन्हे शाखेचा पोलीस महानिरिक्षक असल्याचे म्हणत बेकायदेशीर संपत्ती प्रकरणी कारवाई करण्याची धमकी आरोपीने मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता.
सविस्तर वाचा- 'लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करत राहीन' कंगनाचं आणखी एक ट्विट
- पाटणा - मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) आगामी बिहार निवडणुकीत २२० जागा जिंकेल, असा विश्वास केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना व्यक्त केला. राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही.
सविस्तर वाचा- 'बिहारमध्ये नितिश कुमारांच्या नेतृत्वाखाली एनडीए २२० जागा जिंकेल'
- नवी दिल्ली - कोरोना विरोधातील लढाईत संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची ब्रिटनमधील चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकाने कोरोना लसीच्या चाचण्या पुन्हा सुरू केल्या आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना लसीचा डोस दिल्याने एक स्वयंसेवक आजारी पडला होता. लसीचे दुष्परिणाम होण्यामागे काय कारणे आहेत? याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ पथक काम करत आहे.
सविस्तर वाचा- गुड न्यूज : ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू
- मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास आणि त्यानंतर अभिनेत्री कंगना रणाौत विरूद्ध शिवसेना वाद यावर राजकीय सामना रंगला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, कोरोनाच्या या बिकट काळात सामान्य माणसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य माणसाला कोरोनाचा वाढता प्रसार आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मूलभूत आणि वास्तववादी प्रश्नांपेक्षा माध्यमांवरही दुसऱ्याच गोष्टींवर चर्चा झडत असल्यावरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे. मुंबईकर सामान्य नागरिकांच्या काय समस्या आहेत? आणि कसे जगताय सध्या सामान्य मुंबईकर याविषयी 'ईटीव्ही भारत'चा हा ग्राउंड रिपोर्ट...
सविस्तर वाचा- ईटीव्ही भारत विशेष : मायबाप सरकार कंगना, रिया प्रकरणांबरोबरच 'आमच्या' प्रश्नांकडे लक्ष द्याल काय?
- नवी दिल्ली - भारत आणि चीनदरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर चीन सीमेलगत असलेल्या हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून इंडो-तिबेटीयन सीमा पोलिसांची किन्नौरच्या सीमावर्ती भागात गस्त वाढवली आहे. हिमाचलमध्ये सुमारे 260 कि.मी. सीमा चीनशी जोडलेली आहे. त्यातील 180 किमी किन्नौर तर, 80 किमी लाहौल व स्पीती जिल्ह्याशी जोडलेली आहे.
सविस्तर वाचा- भारत-चीन सीमा तणाव : हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये हाय अलर्ट
- नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीविषयी आपले मत दिले आहे. एक धोकादायक फलंदाज म्हणून विराट कोहली उदयास आला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षात तो सणकी (brat) होता, असे अख्तरने सांगितले
सविस्तर वाचा- ''विराट कोहली माझ्यासारखा 'सणकी', पण..''