ETV Bharat / bharat

Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - राज्यातील बातम्या

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

TOP 10 NEWS AT 9 AM
Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
author img

By

Published : Jun 28, 2020, 9:00 AM IST

मुंबई - माजी पंतप्रधान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंहराव हे राजकारणातील संन्यासी होते, या शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.... देश आणि राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे आणि सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची संधी मिळावी, असे साकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पांडुरंग आणि रुक्मिणी चरणी घातले... सहा जणांनी एका विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली... तुम्ही जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत असाल, तुमच्याकडे चलन, विविध बिल्स तसेच ई-मेल मार्फत आर्थिक व्यवहार सांभाळत असाल, तर सावधान ! कारण आता तुमचे अकाऊंट 'ई-मेल फॉरवर्डर्स'च्या डोळ्यावर आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...

  • जयपूर - तुम्ही जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत असाल, तुमच्याकडे चनल, विविध बिल्स तसेच ई-मेल मार्फत आर्थिक व्यवहार सांभाळत असाल, तर सावधान ! कारण आता तुमचे अकाऊंट 'ई-मेल फॉरवर्डर्स'च्या डोळ्यावर आहे. तुमच्या नकळत ई-मेल्स मार्फत महत्त्वाची माहिती आणि चलनांमधील रक्कम कधी बदलू शकते, हे सांगता येत नाही. सध्या हे ई-मेल फॉरवर्डर्स कॉर्पोरेट कंपन्यांना लक्ष करत आहेत.

सविस्तर वाचा - विशेष : 'कॉर्पोरेट सेक्टर'वर सायबर गुन्हेगारांचे लक्ष; 'ई-मेल फॉरवर्डींग'चा नवा फंडा

  • हैदराबाद - भारताचे माजी पंतप्रधान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंहराव हे राजकारणातील संन्यासी होते, या शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पी. व्ही. नरसिंहराव यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी नरसिंहराव यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

सविस्तर वाचा - भारताचे सुपुत्र पी. व्ही. नरसिंहराव राजकारणातील संन्यासी - डॉ. मनमोहन सिंह

  • पंढरपूर (सोलापूर) - देश आणि राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे आणि सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची संधी मिळावी, असे साकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पांडुरंग आणि रुक्मिणी चरणी घातले. गृहमंत्री देशमुख आषाढी वारीच्या सुरक्षा आढाव्यासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर वाचा - 'बा विठ्ठला...! देशासह राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे'

  • सिंधुदुर्ग - जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेत नाराज आहेत. ते सध्या भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असून आगामी काळात लोकसभा उमेदवार म्हणून ते काम करतील, असा गौप्यस्फोट मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे

सविस्तर वाचा - 'दीपक केसरकर शिवसेनेत नाराज, नवा मार्ग निवडणार'

  • वर्धा - सहा जणांनी एका विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. नराधमांनी या महिलेच्या नवऱ्याला बांधून, नवऱ्यासमोर हे कृत्य केले. ही धक्कादायक घटना वर्ध्याच्या सावंगी मेघे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेलसुरा शिवारात घडली.

सविस्तर वाचा - वर्ध्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आरोपींचा शोध सुरू

  • नवी दिल्ली - महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूसह 8 राज्यांमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी 85.5 टक्के अ‌ॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण आहेत. तर या आठ राज्यांमध्ये देशातील एकूण मृत्यूंपैकी 87 टक्के मृत्यू झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालायने दिली.

सविस्तर वाचा - 'या' आठ राज्यांत कोरोनाचे 85 टक्के अ‌ॅक्टिव्ह रुग्ण, तर 87 टक्के मृत्यू

  • नालासोपारा/ ठाणे - एका व्यक्तीने आपल्या तीन लहान मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नालासोपारा पूर्वेच्या डॉन लेन परिसरात शनिवारी रात्री घडली. कैलास विजू परमार (35), मुलगा नयन परमार (12), मुलगी नंदिनी परमार (7) आणि नयना परमार (3) अशी मृतांची नावे आहेत.

सविस्तर वाचा - धक्कादायक...! पोटच्या तीन मुलांची हत्या करुन बापाने केली आत्महत्या; नालासोपाऱ्यातील प्रकार

  • मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 1460 रुग्ण आढळून आले असून 105 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 73747 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 4282 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 2587 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापार्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 42331 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 27134 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

सविस्तर वाचा - मुंबईत आज 2587 रुग्णांची कोरोनावर मात, आढळले 1460 नवे रुग्ण, 105 जणांचा मृत्यू

  • मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा सर्वाधिक मुंबई शहरात दिसून येत आहे. मात्र, कोरोनाची बाधा झालेल्या मुंबईतील रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये तसेच त्यांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये, म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी घाटकोपर येथे ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी दिली.

सविस्तर वाचा - कोरोनाबाधितांसाठी घाटकोपरमध्ये ऑक्सिजन सेंटर सुरू

  • अमरावती - मागील आठवड्याभरापासून अमरावती जिल्ह्यात पावसाने दांडी मारली. आज दुपारच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा गावात दुपारी मुसळधार पाऊस झाला. यात काकडा परिसरातील शेती पावसाच्या पाण्याने धुवून निघाली. शेतीला काही वेळातच तलावाचे स्वरूप आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काकडा गावात जवळपास ९० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत.

सविस्तर वाचा - अमरावती जिल्ह्यातील काकडा परिसर जलमय; मुसळधार पावसाने शेतीला तलावाचे स्वरुप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.