- सिंधुदुर्ग : राज्य सरकारवर भाजप खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकार सर्वच मुद्द्यावर अपयशी ठरले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीत कोणातही ताळमेळ नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत हे सरकार कोसळेल, असे भाकीत खासदार नारायण राणे यांनी आज(सोमवरा) मालवण येथे केले आहे.
नवी दिल्ली - या' महिन्यात ठाकरे सरकार कोसळणार, नारायण राणेंचे भाकीत
- धुळे - शहरातील चाळीसगाव रोड परिसरात युवकाला मारहाण करुन चाकूने वार करत त्याचा खून केल्याची घटना रविवारी (दि. 9 ऑगस्ट) रात्री घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यातील आरोपी हा मृत युवकाचा मामा असल्याचे सांगितले जात आहे.
सविस्तर वाचा - धुळे: पूर्ववैमनस्यातून धुळ्यात मामाने केला भाच्याचा खून
- हैदराबाद - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी जाहीर केलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दहा फलंदाजांच्या यादीत भारतीय फलंदाज मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे या यादीत मयांक विराट आणि अजिंक्यपेक्षा पुढे आहे.
सविस्तर वाचा - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मयांकने विराटला टाकले मागे
- हैदराबाद - अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा चित्रपट 'द डिसायपल'च्या समर्थनासाठी पुढाकार घेतला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर, व्हेनिस चित्रपट महोत्सव स्पर्धेत निवड झालेला हा मराठी चित्रपट पहिला भारतीय चित्रपट बनला असून त्यामुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
सविस्तर वाचा - व्हेनिस चित्रपट महोत्सव : 'द डीसायपल' या मराठी चित्रपटाला जॅकलीन फर्नांडिसचा पाठिंबा
- मुंबई - अभिनेत्री कंगना रनौत बिनधास्त बोलण्यामुळे नेहमी चर्चेत असते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ती बरीच आक्रमकपणे बोलत असते. बॉलिवूडमधील नेपोटिझ्म मुद्द्यावर तिने आतापर्यंत बऱ्याच गोष्टी बोलल्या आहेत.
सविस्तर वाचा - कंगनाचा आता आयुष्मान खुराणावर निशाणा, म्हणते 'चापलूस आऊटसाइडर्स'
- मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या आमदारांचा समन्वयक म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र वायकर हे शिवसेनेचे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार व माजी कॅबीनेट मंत्री आहेत.
सविस्तर वाचा - रवींद्र वायकरांची मुख्यमंत्री व शिवसेना आमदारांचे समन्वयक म्हणून नियुक्ती
- नाशिक - कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर सध्या शाळांमधून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी वेगवेगळे माध्यम वापरले जात असले तरी त्यात अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.
सविस्तर वाचा - आदिवासी विद्यार्थ्यांना रेडिओद्वारे मिळणार शिक्षणाची संधी...वाचा सविस्तर
- नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्वीटरवरुन त्यांनी ही माहिती दिली. गेल्या आठवडाभरात जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत:ला आयसोलेट करावे. तसेच त्यांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहनही मुखर्जी यांनी केले आहे.
सविस्तर वाचा - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना कोरोनाची लागण
- नवी दिल्ली – अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत युजीसीने सर्वोच्च न्यायालयासमोर आज बाजू मांडली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारने महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय नियमाविरोधात असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) म्हटले आहे.
सविस्तर वाचा - परीक्षा नसेल तर पदवीला मान्यता नाही - युजीसीची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
- हैदराबाद - कोरोनाव्हायरसच्या साथीचा क्रिकेटविश्वावर खोलवर परिणाम झाला आहे. या व्हायरसच्या उद्रेकामुळे आयसीसीला अनेक मोठ्या स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. मागील वर्षी आयसीसीची एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा पार पडली. इंग्लंड संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ईटीव्ही भारतने 'क्रिकेट ऑफ द फील्ड्' या कार्यक्रमात इंडिया स्पोर्ट्स प्रेझेंटेर रिधिमा पाठक, अफगाणिस्तान स्पोर्ट्स प्रेझेंटेर दिवा पतंग आणि पाकिस्तानची झैनाब अब्बास यांच्यासह मागील वर्षीच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
सविस्तर वाचा - VIDEO : २०१९ वर्ल्डकपचा हिस्सा असलेल्या 'त्या' तिघींशी ईटीव्ही भारतची खास मुलाखत