जयपूर - राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय महासंग्रामात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी गुरुवारी (दि. 30 जुलै) सर्व आमदारांना विधानसभा सत्र सुरू होईपर्यंत हॉटेल फेयरमाउंटमध्येही थांंबण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री गहलोत हे आमदारांना संबोधित करत म्हणाले, आपली एकजुटीच हेच आपला विजय आहे.
सविस्तर वाचा - एकजुटीनेच होणार विजय, आमदारांनी हॉटेल सोडू नये - मुख्यमंत्री गहलोत
नवी दिल्ली : समता पक्षाच्या माजी अध्यक्षा जया जेटली यांना दिल्लीच्या रोज अव्हेन्यू न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ऑपरेशन वेस्ट एंड नावाच्या एका स्टिंग ऑपरेशनच्या आधारे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासमवेत इतर आरोपींनाही प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सविस्तर वाचा - ऑपरेशन वेस्ट एंड : समता पक्षाच्या माजी अध्यक्षा जया जेटलींना चार वर्षांची शिक्षा
पुणे - पुण्यात कोरोनासाठी तीन जम्बो हॉस्पिटल्स कधी सुरू होतील, याची टाईमलाईन सरकारने सांगावी. ते सुरू होईपर्यंत उद्यापासून पुण्यात कोणती सुविधा लोकांना उपलब्ध असेल, हे सरकारने सांगावे. त्यासाठी महापालिकेने त्यांचा वाटा उचलावा. पण, राज्य सरकारने महापालिकेला मदत करावी, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
सविस्तर वाचा - पुण्यात तीन जम्बो हॉस्पिटल्स कधी सुरू होतील - चंद्रकांत पाटील
हैदराबाद – काँग्रसेच ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याचे देशातील आर्थिक संकटाचे व्यवस्थापन करण्यात मोदी सरकारला पूर्ण अपयश आल्याची चिदंबरम यांनी टीका केली.
सविस्तर वाचा - आर्थिक अपयशाचे मोदी सरकारला कधी होणार आकलन?
मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची बहीण श्वेतासिंह कीर्ती हिने प्रत्येकाने सत्यासाठी एकत्र उभे राहण्याचे आवाहन केले आहे आणि आपल्या भावाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
सविस्तर वाचा - चला एकजूट होऊ, सत्यासाठी एकत्र उभे राहू, सुशांतच्या बहिणीचे आवाहन
मुंबई - येत्या 24 ते 48 तासांत मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - येत्या 48 तासात किनारपट्टी भागात जोरदार पावसाची शक्यता
कोल्हापूर - भीती बाळगू नये, परंतु स्वत:सह इतरांची काळजी घ्या. त्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा, असा संदेश पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ येथील एकलव्य कोरोना काळजी केंद्रामधून अडीच महिन्याच्या आपल्या बालकासह आज कोरोनामुक्त झालेल्या आई-वडिलांनी दिला.
सविस्तर वाचा - भीती बाळगू नका, काळजी घ्या; अडीच महिन्याच्या बालकासह कोरोनामुक्त झालेल्या आई-वडिलांचा संदेश
मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव असताना पावसाळी आजारांपासून मुंबईकरांचे संरक्षण करता यावे, म्हणून पालिकेचा पेस्ट कंट्रोल विभाग सतत कार्यरत आहे. या विभागातील ५५ कर्मचारी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरही या विभागातील कर्मचाऱ्यांनी मुंबईत डेंग्यूच्या २५९८७ ठिकाणी तर मलेरियाची १०६३५ ठिकाणी शोधून नष्ट केली आहेत.
सविस्तर वाचा - ५५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, तरीही डेंग्यू मलेरियाविरोधात पालिकेची धडक मोहीम
मुंबई - राज्यातील शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, राज्याील सुमारे 1 लाख शेतमजुरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या कापूस व मका या पिकांसाठी फवारणीची कामे मोठ्या प्रमाणावर करावी लागणार असल्याने ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणीचे कौशल्य अधारित प्रशिक्षण शेतमजुरांना देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्यात आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज (दि. 30 जुलै) दिली.
सविस्तर वाचा - 'राज्यातील शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यास सुरुवात'
सॅनफ्रान्सिस्को – फेसबुककडून टिकटॉकप्रमाणेच व्हिडिओ आणि संगीताचे मिश्रण असलेले रिल्स हे अॅप तयार करण्यात येत आहे. यावरून टिकटॉकचे सीईओ केवीन मेयर यांनी फेसबुक कंपनीवर निशाणा साधला आहे. फेसबुक हे टिकटॉकची नक्कल करत असल्याची मेयर यांनी टीका केली आहे.
सविस्तर वाचा - 'टिकटॉक'च्या सीईओंची फेसबुकवर टीका, म्हणाले...