मुंबई - शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. तर याशिवाय आज औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. तर कोरोनाच्या राज्यातील वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या सारख्या राज्यभरातील महत्वपूर्ण घडामोडींचा लाईव्ह आढावा....
सविस्तर वाचा - LIVE : उद्धव ठाकरे-शरद पवारांची बैठक संपन्न, तर हर्षवर्धन जाधवांनी केला राजकारणाला जय महाराष्ट्र
मुंबई - कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याला तत्काळ विलग करत त्याच्यावर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. असे असताना मुंबईत आजच्या घडीला कित्येक कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याने घरातच राहावे लागत आहे. मुंबई महापालिकेचे रुग्णालय असो वा सरकारी वा खासगी, बेडसाठी अनेकांना 10-10 तास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.
सविस्तर वाचा - 'कुणी बेड देतं का बेड..!' कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत बेडच मिळेना..
औरंगाबाद - माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. तर आपली राजकीय उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांचे नाव त्यांनी जाहीर केले आहे. लॉकडाऊनमध्ये अध्यात्मिक पुस्तक वाचून राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर ही भूमिका जाहीर केली.
सविस्तर वाचा - हर्षवर्धन जाधवांनी घेतला राजकीय संन्यास; पत्नी असणार उत्तराधिकारी
हिंगोली- संपूर्ण देशात कोरोनामुळे हाताला काम नसल्याने मोठ्या संख्येने लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. तर, काही भागात पाणी टंचाई असल्यामुळे लोकांना अन्नासह पाण्यासाठीदेखील वणवण करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन पाणी उपलब्ध करून देत नसल्याने, अन ग्रामपंचायतीने साफ झुगारून लावल्याने, पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांनी स्वतःच पाचशे-पाचशे रुपये जमा करून श्रमदानातून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला अन् खोदकामही सुरू केले आहे.
सविस्तर वाचा - पाण्याच्या थेंबासाठी ग्रामस्थ झाले दशरथ मांझी, लोकवर्गणीतून विहिरीचे खोदकाम
जळगाव - श्रमिक रेल्वेने मुंबईहून मध्यप्रदेशात निघालेल्या परप्रांतीय महिलेची सुखरूप प्रसूती झाली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी घडली. रोशनी श्यामसुंदर जगताप असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
सविस्तर वाचा - श्रमीक रेल्वेने मध्यप्रदेशात जाणाऱ्या मजूर महिलेला प्रवासात सुरू झाल्या प्रसवकळा, अन्... .
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेप्रमाणे बँकांकडून सर्वच ग्राहकांना कर्जफेडीसाठी मुदतवाढ मिळणार नाही. कारण टाळेबंदी शिथील केल्याने देशात हळूहळू उद्योग सुरू होत आहे.
सविस्तर वाचा - बँकांकडून सर्वच ग्राहकांना मिळणार नाही कर्जफेडीसाठी मुदतवाढ; 'हे' आहे कारण
मुंबई - श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात तिरंगी मालिका खेळण्याचं निमंत्रण बीसीसीआयला दिलं. यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने, बीसीसीआय पुढे ऑगस्ट महिन्यांमध्ये आफ्रिका दौऱ्याचा प्रस्ताव ठेवला. आफ्रिकेच्या या प्रस्तावावर, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्तर वाचा - 'BCCI ने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी शब्द दिलेला नाही'
मुंबई - कोरोना व्हायरसमुळे येत्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये बरेच बदल दिसू शकतात. कोरोनानंतर क्रिकेटपटूंना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. उदाहरणार्थ, त्यांना सराव दरम्यान शौचालयात जाण्याची परवानगी नाही. तसेच, खेळाडूंना त्यांची टोपी किंवा सनग्लासेस ऑन फील्ड पंचांना देता येणार नाही.
सविस्तर वाचा - कोरोनाचा फटका.. सरावादरम्यान शौचालयाला जाऊ शकणार नाहीत क्रिकेटपटू!
मुंबई - सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांनी अम्फान चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना केली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या चक्रीवादळामुळे खूप नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. यांच्यासाठी कलाकारांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
सविस्तर वाचा - शाहरुख-करिनाने अम्फान चक्रीवादळात अडकलेल्यांसाठी केली प्रार्थना
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिला समुद्र तटाची खूप आठवण येत आहे. इलियानाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यात ती व्हाइट कट आउट स्विमसूटमध्ये दिसत आहे.
सविस्तर वाचा - इलियाना डिक्रुजला सतावतेय समुद्रविहाराची आठवण