- मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना येथे खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूटमार सुरू आहे. ही लूटमार रोखण्यासाठी पालिकेने ५ आयएएस अधिकाऱ्यांची तसेच पालिकेतील लेखा परिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींवर कारवाई करत २६ रुग्णालयांतील १३४ तक्रारींचा निपटारा करून बिलांमधील एकूण २३ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम कमी केली आहे. मूळ बिलाच्या १५ टक्के रक्कम कमी होऊन रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
सविस्तर वाचा - मुंबई महापालिकेचा २६ खासगी रुग्णालयांना दणका; बिल कमी झाल्याने कोरोनाच्या रुग्णांना मिळाला दिलासा
- नवी दिल्ली - चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केली नाही, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसने आज(रविवार) टीका केली. मोदींच्या या वक्तव्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने मागितले आहे. चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केली नाही, हे मोदींचे वक्तव्य चीनचीच भूमिका उचलून धरत नाही का? असा सवाल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे.
सविस्तर वाचा - 'सीमावादावर पंतप्रधान मोदी चीनची भूमिका उचलून धरताहेत'
- औरंगाबाद - राज्याचे कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी शहरात ग्राहक बनून एका दुकानात स्टिंग ऑपरेशन केले. शेतकरी बनून गेलेल्या भुसे यांनी दुकानदाराला युरियाची मागणी केली. मात्र, दुकानदाराने उपलब्ध असुनही युरिया नसल्याचे सांगितले. यानंतर भुसेंनी दुकानदारावर कारवाई करत गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
सविस्तर वाचा - VIDEO : 'नायक' स्टाईल रेड.. चक्क राज्याच्या कृषी राज्यमंत्र्यांनीच शेतकऱ्याच्या वेशात जाऊन केले स्टिंग ऑपरेशन
- मुंबई - सुशांत सिंह राजपूत याने काही दिवसांपूर्वी मुंबईतील राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर आता जवळपास एका आठवड्याने या प्रकरणावर सलमान खाननं प्रतिक्रिया दिली आहे. सलमाननं आपल्या ट्विटमधून आपल्या चाहत्यांना सुशांतच्या चाहत्यांसोबत सहानुभूतीनं वागण्याचं आवाहन केलं आहे.
सविस्तर वाचा - जवळची व्यक्ती गमावणं सर्वाधिक त्रासदायी; सुशांतच्या आत्महत्येवर सलमानची प्रतिक्रिया
- नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधानांवर निशाणा साधला. सीमा भागाच्या सॅटेलाईट छायाचित्रांनी हे स्पष्ट होत आहे, की चीनने भारताचा काही भूभाग बळकवला आहे, असे गांधी यांनी म्हटले.
सविस्तर वाचा - चीनने भारताची जमीन बळकावली; राहुल गांधींनी दिला पुरावा..
- नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली परिसरातील सीमा वादानंतर भारत आणि चीनमधील संबध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांकडून सीमेवर कडेकोट पहारा दिला जात असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्करी साधनसामुग्रीची जुळवाजूळव करण्यात येत आहे. दरम्यान, येत्या बुधवारी(24 जून) भारत आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांना एकमेकांच्या शेजारी बसण्याची वेळ रशियात येणार आहे.
सविस्तर वाचा - भारत- चीनचे संरक्षण मंत्री येणार आमने-सामने.. तणाव निवळण्याबाबत होणार चर्चा?
- चंद्रपूर - भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील मांगली या गावाजवळ घडली. मृतांमध्ये सिद्धेश पंढरीनाथ प्रभुसाळगावकर, सुनील अग्रवाल आणि दशरथ बिबटे यांचा समावेश आहे.
सविस्तर वाचा - नागपूर-चंद्रपूर महामार्गावर टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू
- हैदराबाद - देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, एक दिलासादायक माहिती समाेर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल १३,९२५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, देशातील कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर ५५.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
सविस्तर वाचा - COVID-19 : गेल्या २४ तासांमध्ये १४ हजार रुग्णांवर यशस्वी उपचार; बरे होण्याचा दर ५५.४९ टक्क्यांवर..
- हैदराबाद (तेलंगाणा) - कोरोना उपचारावर प्रभावी असणाऱ्या रेमडेसिव्हिर औषधाच्या निर्मितीसाठी तेलंगाणामधील हेटेरो कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. 'ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'ने या कंपनीला रेमडेसिव्हिरचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी दिली आहे.
सविस्तर वाचा - कोरोनावर गुणकारी 'रेमडेसिव्हिर' आता देशातच बनणार; 'हेटेरो' कंपनीला मिळाली परवानगी..
- अमरावती - देशासह संपूर्ण जगात रविवारी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपल्या कुटुंबासह सामाजिक अंतर ठेऊन मोकळ्या मैदानात योगा, प्राणायाम केला. यावेळी स्वतःला फिट व निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाला दरोरोज काही मिनिटे योग, प्राणायाम, व्यायाम करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. कोरोनाच्या काळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चांगल्या आहारासोबत वृद्धांपासुन ते लहान मुलापर्यंत पर्यत सगळ्यांनी दररोज 30 मिनिट योगा केला पाहिजे, असे आवाहनही खासदार राणा यांनी यावेळी केले.
सविस्तर वाचा - VIDEO : खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणांचा कुटुंबासह योगा