मुंबई - मागील १६ दिवसापासून सुरू असलेली पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ कायम असून आज सोमवारी दिल्लीत पेट्रोल ३३ पैशांनी तर डिझेल ५८ पैशांनी वाढले... भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरांतावर टीका केली होती. त्यानंतर थोरातांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. या वाक् युद्धानंतर आता शिवसेनेने मुखपत्र सामनातून राधाकृष्ण विखेंचा चांगलाच समाचार घेतला आहे... जालन्यात वीज महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला असून वीज जोडणी नसताना शेतकऱ्याला ३० हजाराचे बिल पाठवले आहे... देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या नव्या रुग्णांनी 14 हजारांचा आकडा पार केला, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
नवी दिल्ली - मागील १६ दिवसांपासून सुरू असलेली पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ कायम आहे. आज सोमवारी दिल्लीत पेट्रोल ३३ पैशांनी तर डिझेल ५८ पैशांनी वाढले. वाढीव दरानुसार, दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटर ७९.५६ रुपये तर डिझेल ७८.८५ रुपयांनी विकले जात आहे.
सविस्तर वाचा - सलग १६ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ कायम; एक लीटरसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये
- मुंबई - भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरांतावर टीका केली होती. त्यानंतर थोरातांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. या वाक् युद्धानंतर आता शिवसेनेने मुखपत्र सामनातून राधाकृष्ण विखेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. सत्तेत नसलेल्या विखेंची माशाप्रमाणे अवस्था झाली आहे. त्यातून त्यांना जे वैफल्य आले आहे, त्यामुळेच भाजपमध्ये जाऊन काहीच फायदा न झाल्याची जी चिड आहे, त्या चिडीतूनच ते टाळूवरचे केस उपटत असतील, अशी बोचरी टीका केली आहे.
सविस्तर वाचा - टुरटुर सुरुच..! 'वैफल्यग्रस्त विखे 'त्या' चिडीतूनच टाळूवरचे केस उपटत असतील'
- जालना - वीज महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. 2011 मध्ये अंबड तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने नियमानुसार, कोटेशन भरून शेतीसाठी विजेची मागणी केली होती. वीज जोडणी तर आत्तापर्यंत मिळालीच नाही, पण महावितरणाने तीस हजारांचे बिल मात्र त्या महिला शेतकरीला पाठवले आहे. महावितरणाचे बिल पाहून त्या महिला शेतकरीला धक्काच बसला.
सविस्तर वाचा - 'महावितरण'चा भोंगळ कारभार..! शेतात वीज जोडणीच नाही, तरीही पाठवले ३० हजारांचे बिल
- राजगड (मध्यप्रदेश) - राजगड जिल्ह्याच्या सारंगपूर शहराजवळ गोपालपुरा बायपासवर दोन चारचाकी वाहनांमध्ये समोरा-समोर धडक होऊन एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत.
सविस्तर वाचा - मध्यप्रदेशात चारचाकींची समोरासमोर धडक, ५ जण ठार
- नवी दिल्ली - देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या नव्या रुग्णांनी 14 हजारांचा आकडा पार केला. यामुळे आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतातील रुग्णसंख्या 4 लाखांच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 14 हजार 821 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 445 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा - गेल्या 24 तासात देशात आढळले 14 हजार 821 कोरोनाबाधित; तर 445 जणांचा बळी
- रोहतक ( हरयाणा ) - रणजी ट्रॉफी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक गडी बाद करणारे लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गोयल मागील २ वर्षांपासून आजारी होते. त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा - रणजीत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या महान गोलंदाजाचे निधन
- औरंगाबाद - राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शहरात ग्राहक बनून एका दुकानात स्टिंग ऑपरेशन केले. शेतकरी बनून गेलेल्या भुसे यांनी दुकानदाराला युरियाची मागणी केली. मात्र, दुकानदाराने उपलब्ध असुनही युरिया नसल्याचे सांगितले. यानंतर भुसेंनी दुकानदारावर कारवाई करत गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. राज्यभरातील कृषी दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे या बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला आहे.
सविस्तर वाचा - VIDEO : कृषीमंत्र्यांची 'नायक' स्टाईल रेड.. साठा असूनही युरीया नाकारणाऱ्या दुकानदाराला दणका
- रत्नागिरी - मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना रत्नागिरीतल्या जयगडमध्ये घडली आहे. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या तरुणाचे शोधकार्य सुरू आहे. विरांची विलास खापले (18, रा. पन्हळी, जयगड) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वाचा - जयगडमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण बुडाला
- हिंगोली - शनिवारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये राज्यातून अकराव्या क्रमांकावर हिंगोली जिल्ह्यातील साटंबा या लहानशा गावातील शेतकऱ्यांचा मुलगा ज्ञानेश्वर प्रल्हाद घ्यार हा आला. त्याने उपजिल्हाधिकारी पद पटकावले. ज्ञानेश्वरने घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करुन हे यश मिळवले आहे. याबाबत ईटीव्ही भारतने ज्ञानेश्वरच्या आई वडिलांशी बातचीत केली....
सविस्तर वाचा - शेतकऱ्याचा मुलगा झाला उपजिल्हाधिकारी.. आमचा ज्ञानू इतका मोठा साहेब होईल वाटलं नव्हतं, वडिलांची प्रतिक्रिया
- मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचणे आणि अस्वलासोबत पंगा घेणे, हे एकसारखे असल्याचे, ऑस्ट्रेलियाचा सलामीवर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे. वॉर्नरला कोहलीच्या फलंदाजीची भीती वाटते. त्यामुळेच त्याने बहुतेक हे मत व्यक्त केले असणार आहे.
सविस्तर वाचा -वॉर्नर म्हणतो... विराटला डिवचणे म्हणजे अस्वलाशी पंगा घेण्यासारखे