ETV Bharat / bharat

Top 10 news @10 am: सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी; वाचा एका क्लिकवर..

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

author img

By

Published : May 28, 2020, 10:14 AM IST

Top 10 news @10 am
Top 10 news @10 am

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राज्याचे अर्थचक्र सुरू करण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढणार आहे, असे ते म्हणाले आज ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते, तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे

सविस्तर वाचा - 'लॉकडाऊन शिथिल करताना काळजी घ्या, गांभीर्याने काम करा'

मुंबई - राज्यात बुधवारी कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात १०५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद एकाच दिवसात झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८९७ झाली आहे.

सविस्तर वाचा - राज्यात बुधवारी शंभरहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.५ टक्के

मुंबई - कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला होता. यावर आज महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यात शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस आणि मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला.

सविस्तर वाचा - 'फडणवीस जी, वेळ गेलेली नाही आम्हाला साथ द्या; नाहीतर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून उतराल'

मुंबई - कोरोनाचे संकट, पावसाचे आगमन आणि शेतकऱ्यांची धांदल हा संभाव्य धोका लक्षात घेऊन कापूस खरेदीतील अडचणी दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही खरेदी 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

सविस्तर वाचा - राज्यातील कापूस खरेदी 15 जूनपर्यंत करण्याचे सहकार मंत्र्यांचे आदेश

कोल्हापूर - कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत इचलकरंजीतील मुस्लीम समाजाने आदर्श घालून दिलाय. रमजान ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत स्थानिकांनी पैसे जमलवले; आणि यातून अतिदक्षता विभाग साकारला आहे.

सविस्तर वाचा - 'ईद'च्या अनावश्यक खर्चाला फाटा देत जमवलेल्या रक्कमेतून साकारला अतिदक्षता विभाग

मुंबई - देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकले आहेत. हाताला काम मिळत नसल्याने जवळ पैसे नसल्याने अनेकांनी पायी, काहींनी सायकलवर तर काहींनी मिळेल त्या साधनाच्या मदतीने घरी जाण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

सविस्तर वाचा - रिअल हिरो..! फोन करून राज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदचं केलं कौतुक

नवी दिल्ली - ईझीमाय ट्रीप डॉट कॉम (EaseMyTrip.com) या ट्रॅव्हल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इंडिगो आणि एअर एशिया या कंपन्यांनी आता देशांतर्गत विमानसेवेसोबतच ग्राहकांना रद्द झालेल्या फ्लाइट्सच्या तिकिटांचे रिफंड देण्यासही सुरुवात केली आहे. त्यांनी ट्रॅव्हल एजंट्च्या खात्यामध्ये विमानाच्या तिकिटांचे रिफंड जमा करणे सुरू केले आहे.

सविस्तर वाचा - आता रद्द झालेल्या फ्टाइट्सचे मिळणार रिफंड; इंडिगो, एअर एशिया विमान कंपन्यांनी केली सुरुवात

मुंबई - क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज (बुधवार) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात ४ कसोटी सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा - India Vs Australia : ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने जाहीर केले वेळापत्रक

मुंबई - यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा 2022पर्यंत स्थगित झाली असल्याचे आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले आहे. या निर्णयाची आयसीसीकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. क्रिकेट समितीच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आज टेलिकॉन्फरन्सद्वारे बैठक होत आहे.

सविस्तर वाचा - टी-20 वर्ल्डकप 2022पर्यंत स्थगित - आयसीसी सूत्र

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांनी आपल्या आगामी ‘गुलाबो सीताबो’ चित्रपटावरुन प्रेरित कोविड -१९ मीम्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा - मुंबई पोलिसांनी 'गुलाबो सिताबो'चा मीम केला शेअर, आयुष्यमाननेही दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.