कोल्हापूर - चंदगड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध पतीला जिवंत पेटवून महिलेने स्वतः आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
वाचा सविस्तर - धक्कादायक : वृद्ध पतीला पेटवून महिलेची आत्महत्या, शुश्रूषेला कंटाळून उचलले तिने पाऊल
वर्धा - कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे शाळा बंद आहेत, तर काही शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश मुलं घरी मोबाईल हाताळताना दिसतात. पण मुलांकडून आरोग्य सेतू अॅपवर चूकीची माहिती भरली गेली अन् ते एका कुटुंबाला तापदायक ठरले.
वाचा सविस्तर - आरोग्य सेतू अॅपवर मुलानं दिली उत्तरं, संपूर्ण कुटुंबाला व्हावं लागलं होम क्वॉरंटाइन
पुणे - शहरात आजपासून (मंगळवार) 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा ,दूध आणि मेडिकल वगळता इतर सर्व बंद राहणार आहे. मात्र, असे असतानाही शहरात आज सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
वाचा सविस्तर - पुणे लॉकडाऊन; मात्र, रस्त्यांवर पुन्हा उसळली गर्दी
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यात वेगवेगळ्या शहरांत महिलांवरील घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. मात्र, या संदर्भात राज्य महिला आयोगाकडे प्रत्यक्ष येऊन तक्रारी देण्याचे प्रमाण संचारबंदीमुळे कमी झाल्याचे समोर आले आहे.
वाचा सविस्तर - Exclusive: मुंबईतून घरगुती हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी ; राज्य महिला आयोग सक्रीय
नांदेड - राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद अन् विधानसभा, अशा केंद्र अन् राज्यातील चारही सभागृहांचे सभासद राहिलेले शंकरराव चव्हाण तब्बल ५० वर्ष राजकारणात सक्रीय होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून ते देशाच्या गृहमंत्रिपदार्यंत थेट मजल मारली.
वाचा सविस्तर - निवडणूक आयोगालाही न्यायालयात खेचणारे पहिले गृहमंत्री, शंकरराव चव्हाणांचा राजकीय प्रवास
सोलापुर - एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. अमोल अशोल जगताप (वय 36), मयुरी अमोल जगताप (वय 27), आदित्य अमोल जगताप (वय 5), आयुष अमोल जगताप (वय 3) असे आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत.
वाचा सविस्तर - धक्कादायक..! सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
चंद्रपूर - सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या दोन जणांचा, झाडावरच वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
वाचा सविस्तर - वीज पडून दोघांचा मृत्यू, तर ४ गंभीर; तळोधी येथील घटना
हैदराबाद - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासांत देशात सर्वाधिक 28 हजार 701 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. बाधितांची एकूण संख्या 8 लाख 78 हजार 254 इतका झाला आहे.
वाचा सविस्तर - देशात 24 तासात 28 हजार 701 कोरोनाबाधित; पाहा देशातील आढावा एका क्लिकवर...
मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यावर, त्यांना सौम्य लक्षणे असताना, इतर नागरिकांप्रमाणे त्यांना होम क्वारंटाईन का केले नाही?, त्यांचा आणि नानावटी रुग्णालयाचा संबंध काय? जास्त बिल घेणाऱ्या नानावटी रुग्णालयाला उच्च न्यायालयाने झापल्याने नानावटीची बदनामी रोखण्यासाठी अमिताभ अॅडमिट झाले का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.
वाचा सविस्तर - 'श्रीमंत आणि गरीब भेदभाव नको; अमिताभ प्रमाणे गरिबांवरही खासगी रुग्णालयात उपचार करा'
पुणे - करिअर मार्गदर्शन करणाऱ्या एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने एका 18 वर्षीय विद्यार्थिनीला मित्राच्या फ्लॅटवर घेऊन जात तिच्यासोबत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वाचा सविस्तर - पुण्यात कोचिंग क्लासच्या शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार