ETV Bharat / bharat

Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

Top 10 AT 9 AM
Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...
author img

By

Published : Jun 20, 2020, 8:58 AM IST

मुंबई - सलग १४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५१ पैशांनी तर डिझेलच्या दरात ६१ पैशांनी वाढ करण्यात आली... स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील नाराजी नाट्यावर शुक्रवारी रात्री उशिरा पडदा पडला आहे... चीनने घुसखोरी केल्याचे पंतप्रधान मोदींनी नाकारले आहे. आज जागतिक निर्वासित दिन या निमित्ताने खास लेख, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...

  • नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर असतानाही सलग १४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५१ पैशांनी तर डिझेलच्या दरात ६१ पैशांनी वाढ करण्यात आली. मागील १४ दिवसांत पेट्रोल ७.६२ रुपयांनी तर डिझेल ८.२८ रुपयांनी वाढले आहे.

सविस्तर वाचा - सलग १४ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

  • कोल्हापूर - राज्यपाल कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकी देण्याची शरद पवारांनी घोषणा केल्यानंतर स्वाभिमानी पक्षातूनच टीका व्हायला सुरुवात झाली होती. राजू शेट्टी यांचे खंदे कार्यकर्ते समजले जाणारे राज्याचे अध्यक्ष प्रा. जालंदर पाटील आणि सावकार मादनाईक या घरच्या व्यक्तींनीच शेट्टींवर टीका करत नाराजी व्यक्त केली होती. मात्र या नाराजी नाट्यावर शुक्रवारी रात्री उशिरा पडदा पडला आहे. शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना ज्या पद्धतीने म्हटले होते, हे केवळ पेल्यातील वादळ आहे, दोन दिवसांत शांत होईल. त्याच पद्धतीने हे वादळ आता शांत झाले असून सर्वजण पुन्हा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

सविस्तर वाचा - पेल्यातील वादळ अखेर पेल्यातच थंडावले; स्वाभिमानीचे पदाधिकारी म्हणाले 'हम साथ साथ है'

  • हैदराबाद - जगभरातील निर्वासितांच्या प्रश्नांबाबत जनजागृती व्हावी यासाठी २० जून हा जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला जातो. निर्वासितांच्या संयुक्त राष्ट्र उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात सुमारे सत्तर दशलक्ष लोक हे निर्वासित आहेत. हे लोक युद्ध, दहशतवाद, छळवणूक किंवा इतर संकटांपासून वाचण्यासाठी आपले घरदार सोडून निघतात, आणि देशोधडीला लागतात. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये झालेल्या नोंदीनुसार वर्षभरात प्रत्येक मिनिटाला २५ लोक निर्वासित झाले होते.

सविस्तर वाचा - जागतिक निर्वासित दिन : जाणून घ्या प्रत्येक मिनिटाला जगामध्ये किती लोक निर्वासित होतात...

  • नवी दिल्ली : भारत-चीन सीमा वादात 20 भारतीय जवान हुतात्मा झाल्यानंतर देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. थोड्या वेळापूर्वीच बैठक पार पडली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला संबोधित केले. चीनने घुसखोरी केल्याचे पंतप्रधान मोदींनी नाकारले, तसेच सीमेवरील परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला सर्व अधिकार दिले असल्याचे ते म्हणाले.

सविस्तर वाचा - चीनने भारताच्या भूमीत घुसखोरी केली नाही - पंतप्रधान मोदी

  • नवी दिल्ली : भारत- चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारला काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मागितली. तसेच चीनने 5 मे ला पहिल्यांदा भारतीय भूमीत अतिक्रमण केले तेव्हा सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवायला हवी होती, असे मत व्यक्त केले. सीमेवरील सद्यस्थिती आणि लष्करी तयारीची माहिती त्यांनी सरकारकडे मागितली.

सविस्तर वाचा - भारत- चीन सीमा वाद: सर्वपक्षीय बैठकीत सोनिया गांधींनी सरकारकडे मागितली 10 प्रश्नांची उत्तरं

  • मुंबई- मुंबईतील खासगी क्लिनिक, दवाखाने तत्काळ उघडा, असे वारंवार आदेश राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका देत आहे. मात्र, त्यानंतरही अनेक खासगी डॉक्टर पालिकेकडून पीपीई किट मिळत नसल्याचे सांगत क्लिनिक-दवाखान्याचे शटर बंदच करुन घरी बसले आहेत. अशा डॉक्टरांना अखेर पालिकेने आता चांगलेच सुनावले आहे. आधी क्लिनिक उघडा, काही मिनिटातच 7 दिवसाचे पीपीई किट देऊ, असे आव्हानच आता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या डॉक्टरांना दिले आहे.

सविस्तर वाचा - 'डॉक्टरांनी आधी क्लिनिक उघडावे, पीपीई किट तत्काळ मिळतील...'

  • जळगाव - येथील कोविड रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा अजून एक धक्कादायक किस्सा शुक्रवारी दुपारी समोर आला. कोविड रुग्णालयात चक्क नातेवाईकांकडूनच रुग्णांची सेवा करुन घेत असल्याचा गंभीर प्रकार थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या पहिल्याच पाहणीत समोर आला. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवारी दुपारी कोविड रुग्णालयाची पाहणी केली. त्यात हा प्रकार उघड झाला. दरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांना का सेवा करावी लागतेय ? नातेवाईक थेट रुग्णालयात कसे येतात ? असा जाब त्यांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

सविस्तर वाचा - धक्कादायक; कोविड रुग्णालयात नातेवाईक करतात रुग्णांची सेवा, जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत झाले उघड

  • मुंबई - बॅकलॉक व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले ? राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नाही... हे "शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे" पाप असून आमची भिती खरी ठरली आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच" केली, अशा शब्दात भाजपनेते माजी शिक्षण मंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांनी शासनाच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला आहे. पदवी अंतिम वर्षाबाबत गेले अनेक दिवस या विषयाचा पाठपुरावा करणाऱ्या माजी शिक्षणमंत्री आमदार आशिष शेलार यांनी आज शासन निर्णय जारी झाल्यानंतर त्यावर जोरदार टीका केली.

सविस्तर वाचा - परीक्षेच्या निर्णयावर आशिष शेलार म्हणाले; राज्य सरकारची विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच"

  • मुंबई - कोरोनासोबत आपण सर्वजण मागील 3 महिन्यांपासून लढत आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला आहे. तरीही मृत्यू दर वाढत आहे, हे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यात वाढ होत आहे. रुग्णांना शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे. या कामात अजिबात ढिलाई नको. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्या दिले. आज (शुक्रवार) मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे झालेल्या या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते.

सविस्तर वाचा - मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

  • मल्लापुरम(केरळ) - कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे देशभरातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. शक्य होईल, तसे ऑनलाईन क्लास घेण्याचा प्रयत्न शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी घेणारे शिक्षक करत आहे. मात्र, इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप या सर्व सुविधा सगळ्यांकडेच आहेत असे नाही. केरळमध्ये तर राहीज आणि रमीझा या दोन विद्यार्थ्यांच्या घरी दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच वीज आली आहे. त्यामुळे त्यांना आता ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य होणार आहे.

सविस्तर वाचा - केरळ: १० वर्षानंतर घरी आली वीज, आता ऑनलाईन शिक्षणही घेणं होणार शक्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.