मुंबई - हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय भूभाग चीनच्या हवाली केला असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली... मेळघाटामध्ये अंधश्रद्धेतून पोटफुगीवर उपचार म्हणून एका २६ दिवसीय चिमुकली मुलीच्या पोटावरही गरम चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे... मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असलेला पाकिस्तानी कॅनेडियन दहशतवादी तहव्वुर हुसेन राणा (वय ५८) याला अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय बैठकीत “चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केली नाही.”असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी ट्विट करुन टीका केली आहे. गांधी यांनी ट्विटमध्ये “चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला आहे' अशी टीका केली आहे.
सविस्तर वाचा - “चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केलाय"; राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका
- अमरावती - मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील एका आठ महिन्याच्या मुलाच्या पोटावर गरम विळ्याने शंभर चटके (डंबा) देण्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, अशाच प्रकारे अंधश्रद्धेतून पोटफुगीवर उपचार म्हणून एका २६ दिवसीय चिमुकली मुलीच्या पोटावरही गरम चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. चिखलदरा तालुक्यातील बारुगव्हाण या गावात ही घटना घडली आहे. दरम्यान, त्या मुलीवर चुरणी येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वाचा - मेळघाटात आणखी एक अघोरी कृत्य; २६ दिवसीय चिमुकलीच्या पोटावर दिले चटके
- कोल्हापूर - राज्यपाल कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकी देण्याची शरद पवारांनी घोषणा केल्यानंतर स्वाभिमानी पक्षातूनच टीका व्हायला सुरुवात झाली होती. राजू शेट्टी यांचे खंदे कार्यकर्ते समजले जाणारे राज्याचे अध्यक्ष प्रा. जालंदर पाटील आणि सावकार मादनाईक या घरच्या व्यक्तींनीच शेट्टींवर टीका करत नाराजी व्यक्त केली होती. मात्र या नाराजी नाट्यावर शुक्रवारी रात्री उशिरा पडदा पडला आहे. शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना ज्या पद्धतीने म्हटले होते, हे केवळ पेल्यातील वादळ आहे, दोन दिवसांत शांत होईल. त्याच पद्धतीने हे वादळ आता शांत झाले असून सर्वजण पुन्हा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
सविस्तर वाचा - पेल्यातील वादळ अखेर पेल्यातच थंडावले; स्वाभिमानीचे पदाधिकारी म्हणाले 'हम साथ साथ है'
- वॉशिंग्टन - मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असलेला पाकिस्तानी कॅनेडियन दहशतवादी तहव्वुर हुसेन राणा (वय ५८) याला अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. राणाला भारताच्या ताब्यात दिले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राणावर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
सविस्तर वाचा - मुंबई २६/११ हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेत अटक
- हैदराबाद - जगभरातील निर्वासितांच्या प्रश्नांबाबत जनजागृती व्हावी यासाठी २० जून हा जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला जातो. निर्वासितांच्या संयुक्त राष्ट्र उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात सुमारे सत्तर दशलक्ष लोक हे निर्वासित आहेत. हे लोक युद्ध, दहशतवाद, छळवणूक किंवा इतर संकटांपासून वाचण्यासाठी आपले घरदार सोडून निघतात, आणि देशोधडीला लागतात. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये झालेल्या नोंदीनुसार वर्षभरात प्रत्येक मिनिटाला २५ लोक निर्वासित झाले होते.
सविस्तर वाचा - जागतिक निर्वासित दिन : जाणून घ्या प्रत्येक मिनिटाला जगामध्ये किती लोक निर्वासित होतात...
- नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर असतानाही सलग १४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५१ पैशांनी तर डिझेलच्या दरात ६१ पैशांनी वाढ करण्यात आली. मागील १४ दिवसांत पेट्रोल ७.६२ रुपयांनी तर डिझेल ८.२८ रुपयांनी वाढले आहे.
सविस्तर वाचा - सलग १४ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
- शिरुर (पुणे) - गाव व गावातील अनेकांचे संसार गुण्या-गोविंदाने सुरू असताना शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावात अवैध दारुविक्री सुरू झाली आणि गावातील अनेकांच्या सुखी संसारात भांडणतंटे सुरू झाले. याबाबत पिंपरी दुमाला गावच्या सरपंच मनीषा खेडकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पण, पोलीस लक्ष देत नसल्याने अखेर सरपंच महिलेनेचे हातात दंडुका घेऊन दारू विक्रेत्याला चोप देत चांगलाच समाचार घेतला. यानंतर सर्वत्र दबंग महिला सरपंच मनीषा खेडकर यांचीच चर्चा सुरू झाली आहे.
सविस्तर वाचा - VIDEO : महिला सरपंचाने घेतला 'दुर्गा' अवतार... दारू विक्रेत्याची केली धुलाई
- नवी दिल्ली - भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याची 'राजीव गांधी खेलरत्न' क्रीडा पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) शिफारस करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अर्जून पुरस्कारासाठी नामांकन न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या एच. एस. प्रणॉय याला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली.
सविस्तर वाचा - दिलगिरीनंतरनंतर श्रीकांतची 'खेलरत्न'साठी शिफारस; टीका करणाऱ्या प्रणॉयला कारणे दाखवा नोटीस
- हैदराबाद - भारताचे हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी हैदराबादमधील संयुक्त स्नातक परेडमध्ये भाग घेतला. सीमेवरील चीनची कारवाई स्वीकारहार्य नाही. कोणत्याही आकस्मिकतेस प्रतिसाद देण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठीही पूर्णपणे कटिबद्ध आहे. तसेच मी देशाला आश्वासन देतो की, गलवान खोऱ्यातील बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे भदौरीया परेडला संबोधित करताना म्हणाले.
सविस्तर वाचा - 'गलवान खोऱ्यातील जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही'
- मुंबई - दिवसेंदिवस मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिका, खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. स्टेडियम, मोकळी उद्याने याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर उभारली जात आहे. याचाच एक भाग म्हणून धारावीत निसर्ग उद्यानात ऑक्सिजन बेडसह अत्याधुनिक सुविधा असलेले २०० बेडच्या क्षमतेचे कोरोना केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामुळे दादर, माहिम, धारावीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सविस्तर वाचा - धारावीतील निसर्ग उद्यानात २०० बेडचे कोरोना केंद्र सुरू