- मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतच आहे. आज (शनिवारी) राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. रविवारी तब्बल 20 हजार 489 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 312 जणांचा मृत्यू झाला.
सविस्तर वाचा- राज्यात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक, दिवसभरात २० हजार ४८९ नव्या रुग्णांची वाढ
- जळगाव - विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका-टिप्पणी करूच शकत नाही. कारण आम्ही (देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून) सर्व तत्त्व, सत्त्व विसरून त्यांच्यासोबत चार दिवसांचा संसार केला आहे. मुहूर्त साधला, लग्न केले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली.
सविस्तर वाचा- 'फडणवीस अजित पवारांवर टीका करूच शकत नाही, कारण आम्ही त्यांच्यासोबत चार दिवसांचा संसार केलाय'
- सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील जाणवली कृष्णनगरीसमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात दोन मोटरसायकलांमध्ये झाला. मृतांमध्ये दोन तरुण हे रत्नागिरी पाचलमधील आणि कोल्हापूर येथील एका तरुणाचा समावेश आहे. तर एक तरुण गंभीर आहे.
सविस्तर वाचा- मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर एक गंभीर
- कोल्हापूर/ नाशिक - राज्यात कोरोनामुळे आरोग्यसेवा कोलमडून पडली असताना राज्याची मान शरमेने खाली घालणाऱ्या दोन घटना समोर आल्या आहेत. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्हच्या या वादात गर्भवतीला रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने महिलेची रुग्णालयासमोरील रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे घडली आहे. दुसऱ्या घटनेत नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने एका महिलेची प्रसूती गुरुवारी (3 सप्टेंबर) रस्त्यावरच झाली होती. त्यानतंर त्या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता.
सविस्तर वाचा- संतापजनक.. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने दोन गर्भवतींची रस्त्यावरच प्रसूती
- श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर आज(शनिवार) पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकने केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला तर दोन जण जखमी झाले. जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तर दाखल भारतीय सैन्यांनीही गोळीबार केला.
सविस्तर वाचा- पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन...१ जवान शहीद तर दोन जखमी
- नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० क्रांतिकारक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. येत्या दहा वर्षात देशात विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे प्रमाण (प्रवेश) दुप्पट होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सविस्तर वाचा- 'पुढील दहा वर्षात देशात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं प्रमाण दुप्पट होईल'
- हैदराबाद - एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज(शनिवार) पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला. 'देशामध्ये कोरोनाचा प्रसार झालेला असताना पंतप्रधान मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. विविध देशांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली, मात्र, आपले पंतप्रधान भाषण देतात.
सविस्तर वाचा- 'कोरोनामुळं संसदेतील प्रश्नोत्तरांचा तास रद्द, मात्र, जेईई-नीटची परीक्षा होणार'
- जळगाव - सन 2014मध्ये भाजपचे एकट्याच्या बळावर सरकार आल्यानंतर मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो. मात्र, मला बाजूला करण्यासाठी माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले. मला नाहक बदनाम करण्यात आले. माझ्याविरुद्ध एकही आरोप सिद्ध झालेला नाही. तरीही पक्षाने माझा गुन्हा काय आहे, ते स्पष्ट केलेले नाही. मी दोषी असेन तर, मला निश्चितच शिक्षा दिली पाहिजे.
सविस्तर वाचा- पक्षातील ठराविक नेत्यांनी माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली; खडसेंनी थोपटले फडणवीसांविरुद्ध दंड
- मुंबई- काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी काँग्रेसला दिला आहे.
सविस्तर वाचा- राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करा, अन् शरद पवारांना अध्यक्ष करा, आठवलेंचा सल्ला
- मुंबई - अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले आहे. यामुळे रियाला उद्या (रविवारी) 6 सप्टेंबरला एनसीबीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला शुक्रवारी अटक केली होती. यामुळे चौकशीनंतर रियाला अटक केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
सविस्तर वाचा- सुशांतसिंह प्रकरण : उद्या रिया चक्रवर्ती एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर राहणार