नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे काल निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वाचा सविस्तर - प्रणव मुखर्जींवर आज होणार अंत्यसंस्कार...
मुंबई : दक्षिण मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर भरधाव गाडी फुटपाथवर चढल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून, चार जखमी आहेत. जखमींना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री हा अपघात झाला.
वाचा सविस्तर - भरधाव कारने फुटपाथवरील लोकांना चिरडले; चौघांचा जागीच मृत्यू
गडचिरोली - भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणातून पाणी सोडल्याने गडचिरोली जिल्ह्यात 1992 पेक्षाही मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत. तसेच आज तिसऱ्या दिवशीही पूरपरिस्थिती कायम आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने 2400 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
वाचा सविस्तर - गडचिरोलीत पूरस्थिती कायम; 2400 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
मुंबई - गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्थीच्या दिवशी सांगता होत आहे. आज दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार असून यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. विसर्जनासाठी ४४५ स्थळं निश्चित करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण शहरात ३५ हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वाचा सविस्तर - गणपती बाप्पाला आज निरोप ! मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त
नागपूर : आजपासून जेईई-मेन्स परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा सुरू होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात सुनावणी होणार आहे. विदर्भातील पूरग्रस्त भागांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेता, ही परीक्षा पुढे ढकलावी अशी याचिका एका नागरिकाने दाखल केली होती. त्याबाबत ही विशेष सुनावणी होणार आहे.
वाचा सविस्तर - जेईई पुढे ढकलण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका; परीक्षेच्या अर्ध्या तासापूर्वी होणार विशेष सुनावणी
अमरावती - जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावातील दोन वर्षीय चिमुकल्या मुलाच्या पोटावर उपचार म्हणून गरम चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून सध्या या बालकावर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाचा सविस्तर - मेळघाटात पुन्हा दोन वर्षांच्या बालकाच्या पोटावर गरम चटके, दोन महिन्यातील तिसरी धक्कादायक घटना
मुंबई - विदर्भात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचण येत आहे. या पार्श्वभुमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला. त्यावर धोत्रे यांनी या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन आपल्याला दिले असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
वाचा सविस्तर - विदर्भातील जेईई-नीटच्या विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही - उदय सामंत
सवाई माधोपूर (राजस्थान) - जिल्ह्यातील रणथंभोर किल्यावर त्रिनेत्र गणपतीचे मंदिर आहे. देश विदेशातील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. मंदिरासंदर्भात प्रसिद्ध असलेल्या अनेक कथा, आख्यायिका या मंदिराला विशेष बनवतात. यामुळेच भाविकांची याठिकाणी मोठी गर्दी असते. येथील स्थायी लोक कोणत्याही शुभ कार्याआधी बाप्पांना निमंत्रण पाठवतात. भाविकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणाऱ्या 'त्रिनेत्र गणेश'च्या संदर्भातील ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट.
वाचा सविस्तर - चिठ्ठ्यांमधून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारा राजस्थानमधील 'त्रिनेत्र गणेश'
सातारा - जिल्ह्यात जावळी तालुक्यातील मेढा येथील मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामध्ये आई वडिलांसह दोन मुलांचा समावेश असून तीन मृतदेह सापडले आहेत. तसेच एका मृतदेहाचा शोध घेणे सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पैशांच्या देवाण-घेवाणीतून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे.
वाचा सविस्तर - साताऱ्यातील मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या
मुंबई - महाराष्ट्रात सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) ११ हजार ८८२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज (३१ ऑगस्ट) ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९४ हजार ५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
वाचा सविस्तर - महाराष्ट्रात ११ हजार ८८२ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ